esakal
छत्रपती संभाजीनगर

Beed News : गेवराईतील ४२ गावांत महिलांसाठी आरक्षण

दहावी उत्तीर्णची अट : पोलिस पाटील पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर

सकाळ वृत्तसेवा

गेवराई/जातेगाव: पोलिस व महसूल प्रशासन यांच्यामधील दुवा आणि गावात मानाचे पद म्हणून पोलिस पाटील यांना ओळखण्यात येते. गुरुवारी तालुक्यातील १४३ गावांतील पदाची आरक्षण सोडत बीड तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. यात तालुक्यातील ४२ गावांत आता महिला पोलिस पाटील बनणार आहेत.

मागील काही वर्षांपासून गेवराई तालुक्यातील जवळपास १४३ गावातील पोलिस पाटलांचे पदे रिक्त होते. तर विभाजन गावात देखील आता हे पदे मंजूर करण्यात आली. गुरुवारी झालेल्या आरक्षण सोडतीत ४२ महिला आता गेवराई तालुक्यात पोलिस पाटील या मानाच्या पदावर बसणार आहेत. गावखेड्यात पाटलीन बाईला मोठा मान मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी पुरुषांची या महत्त्वाच्या पदावर वर्णी होती. मात्र, ३० टक्के महिला आरक्षणामुळे लगाम बसला आहे.

प्रवर्गनिहाय महिलांसाठी आरक्षित गावे

  • अनुसूचित जाती : तपेनिमगाव,गौंडगाव, उक्कडपिंपरी, कुंभेजळगाव, राक्षसभुवन.

  • अनुसूचित जमाती : अर्धमसला, गुंतेगाव, दिमाखवाडी, पाथरवाला बु.

  • विमुक्त जाती अ प्रवर्ग : दामुनाईक तांडा, काठोडा तांडा, खोपटी.

  • भटक्या जमाती ब प्रवर्ग : बेलगाव, शेकटा.

  • भटक्या जमाती क प्रवर्ग : पिंपळगाव कानडा, शेकटा.

  • विशेष मागास प्रवर्ग : सेलू, मुधापुरी.

  • इतर मागास प्रवर्ग : गोविंदवाडी तहत गेवराई, धोंडराई, जातेगाव, अंतरवाली बुद्रूक, बंगाली पिंपळा, अर्धपिंपरी, लोळदगाव, काजळा, पाडळसिंगी.

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : ब्रह्मगाव, डिग्रस, कुंभारवाडी, बाबुलतारा.

  • सर्वसाधारण खुला : मिरकाळा, तरटेवाडी, राजपिंप्री, कोपरा, मालेगाव खुर्द, वंजारवाडी, ताकडगाव, भाटअंतरवाली, कोलतेवाडी, खांडवी, हिरापूर.

धारूरमधील तीस टक्के महिला होणार पोलिस पाटील

किल्लेधारुर, ता. ८ (बातमीदार) ः तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाच्या जागेसाठी आरक्षणाची सोडत बुधवारी माजलगावच्या तहसील कार्यालयात काढण्यात आली. यामध्ये महिलांसाठी ३० टक्के गावे आरक्षित करण्यात आली.

अनुसूचित जातीमध्ये कोळपिंपरी , चिखली, आवरगाव, पहाडी दहिफळ तर महिलांमध्ये ह सिंगणवाडी आणि संगम गावाचा समावेश आहे. अनुसूचित जमातीमध्ये कचारवाडी, पहाडी पारगाव, हिंगणी बु. गांजपूर तर महिलात चोरंबा, अरणवाडी, चिंचपूरचा समावेश आहे. अनुसूचित विमुक्त जातीमध्ये महिलांमधून गोपाळपूर गावाचा समावेश आहे. भटक्या जमाती (क) मध्ये सुरनरवाडी, निमला, व्हरकटवाडी, काठेवाडीचा समावेश आहे. भटक्या जमाती (ड) मध्ये मैंदवाडी, कांदेवाडी तर महिलातून घागरवाडा गावाचा समावेश आहे. इतर मागासवर्गीयमधून सुकळी, देवठाणा, चारदरी, फकीर जवळा तर महिलातून खोडस, देवदहीफळ, तेलगावचा समावेश आहे.

आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) कान्नापूर, म्हातारगाव, रुई धारूर, चाटगाव तर महिलांमधून कोथिंबीरवाडी, सोनीमोहा गावाचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातून रेपेवाडी, हसनाबाद, आमला, कारी, पांगरी, मुंगी, कासारी, आंबेवडगाव, उंबरेवाडी, जायभायवाडी, गावंदरा, बोडखा, कोयाळ, चोंडी, पिंपरवाडा तर महिलांमध्ये वाघोली, तांदळवाडी, अंजनडोह, आसोला, मोरफळी, कुंडी गावाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT