development plan of the Chatrapati Sambhajinagar city sakal
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar News : शहराचा सुधारित प्रारूप विकास आराखडा अखेर सादर

शासन नियुक्त विशेष अधिकारी तथा नगर रचना विभागाचे उपसंचालक श्रीकांत देशमुख यांनी मार्च महिन्यात जुन्या विस्तारित शहराचा प्रारूप विकास आराखडा सादर केला होता.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - जुन्या व विस्तारित शहराचा विकास आराखडा अंतिम करण्यासाठी आणखी एक टप्पा पूर्ण झाला. शासन नियुक्त समितीने हरकती, सूचनांवरील सुनावण्या घेतल्यानंतर शिफारशींसह शहराचा प्रारूप विकास आराखडा बुधवारी (ता. सात) शासन, महापालिकेकडे सादर झाला. गुरुवारी (ता. आठ) हा आराखडा नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. त्यानंतरच समितीने काय बदल केले हे स्पष्ट होणार आहे.

शासन नियुक्त विशेष अधिकारी तथा नगर रचना विभागाचे उपसंचालक श्रीकांत देशमुख यांनी मार्च महिन्यात जुन्या विस्तारित शहराचा प्रारूप विकास आराखडा सादर केला होता. त्यानंतर साठ दिवसांच्या कालावधित सुमारे साडेआठ हजार सूचना व हरकती प्राप्त झाल्या. त्यांची सुनावणी चार तज्ज्ञांची समितीने घेतली.

त्यानंतर प्रारूप आराखड्यात सुधारणा करण्याच्या शिफारशी तज्ज्ञांच्या समितीने विशेष अधिकारी श्रीकांत देशमुख यांच्याकडे केल्या. त्यांनी सुधारित प्रारूप विकास आराखडा तयार केला. हा आराखडा बुधवारी शासनाला सादर करण्यात आला. त्याची एक प्रत नगर रचना विभागाच्या संचालकांना व एक प्रत महापालिकेच्या प्रशासकांना देण्यात आली.

आता बांधकाम परवानगी देता येणार

सुधारित प्रारूप विकास आराखड्याच्या आधारे महापालिकेला आता बांधकाम परवानग्या देता येतील असे प्रशासकांनी सांगितले. आरक्षित जागांवर ज्या-ज्या ठिकाणी निवासी बांधकामे झालेली आहेत ती बांधकामे गुंठेवारी अधिनियमांतर्गत आता नियमित करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुंठेवारीचा विळखा होणार सैल

शहराचा विकास आराखडा तब्बल ३३ वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे शहर परिसराला अनधिकृत गुंठेवारी वसाहतींचा विळखा पडला असून, महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर झालेच उलट या भागातील विकास कामांसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शहराचा विकास आराखडा तयार केल्यास बेकायदा वसाहतींना आळा बसेल, असे मानले जात आहे.

अकरा सेक्टरमध्ये शहराची विभागणी

प्रारूप आराखड्यात शहराची विभागणी अकरा सेक्टरमध्ये करण्यात आली. प्रत्येक सेक्टरनिहाय सुधारणांची माहिती आराखड्यासोबत देण्यात आली. त्याची माहिती नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने पाहता येईल. ]

फेरबदलाचा प्रारूप विकास आराखडा सादर करण्यात आला आहे. शासनस्तरावर आराखड्याच्या संदर्भात पुन्हा एकदा हरकती, सूचना मागवून तो अंतिम करण्यात येईल.

- जी. श्रीकांत, प्रशासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT