Chhatrapati Sambhajinagar Crime Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : घरफोड्यांचा धुमाकूळ; कुलूपबंद घरांतून नऊ लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात दोन घटनांत चोरट्यांनी कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत ९ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. पन्नालालनगर आणि बन्सीलालनगर भागात हे प्रकार घडले. याप्रकरणी उस्मानपुरा आणि वेदांतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घरफोडीची पहिली घटना : ता. २८ मे ते २८ जून या कालावधीत पन्नालालनगर भागातील प्राइड सेन्च्युरी येथे घडली. डॉ. अंजली राजपूत घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. यादरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाटातील ५० ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे कॉइन (किंमत ३ लाख ३ हजार रुपये) चोरून नेले.

डॉ. राजपूत घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय आबुज करीत आहे.

दुसरी घटना : ९ जुलैला श्रेयस अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक ५, बन्सीलालनगर येथे घडली. किशोर मदनलाल राठी (वय ५६) सकाळी साडेदहा वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडत आतमध्ये प्रवेश केला.

कपाटातील लॉकरमधील ७० हजार रुपये रोख, मंगळसूत्र, सोनसाखळी, चार अंगठ्या, घड्याळ आदी ६ लाख १४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. राठी सायंकाळी घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय मोरे करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT