Nutritional Food Sakal
छत्रपती संभाजीनगर

Nutritional Food: पोषण आहाराचा ‘दुष्काळ’, दुष्काळग्रस्त भागातील ग्रामीण विद्यार्थी वंचित

सकाळ वृत्तसेवा

दुष्काळग्रस्त भागामधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मे-जूनच्या उन्हाळी सुटीतही शिजवलेला पोषण आहार उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, सद्यःस्थितीत उन्हाची तीव्रता व पाणीटंचाईची समस्या भीषण असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

शासनाने २०२३-२४ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील १८० महसूल मंडळांचा समावेश आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४४० शाळेतील ५१ हजार १३४ विद्यार्थी दुष्काळग्रस्त भागात येतात. दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या भागासाठी शासनाने विविध सवलती लागू केलेल्या आहेत.

त्यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत माध्यान्ह भोजन देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. मे व जून २०२४ कालावधीसाठी शासकीय सुट्या वगळून इतर सर्व दिवशी विद्यार्थ्यांना पोषण आहार द्यायचा आहे.

विद्यार्थ्यांना शाळास्तरावर शिजविलेला आहार उपलब्ध करून देण्यासाठी मुख्याध्यापक किंवा किमान एक शिक्षक शाळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. शाळा प्रशासनाने आहार शिजविण्यासाठी स्वयंपाकी, मदतनीस यांना उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना देणे गरजेचे आहे. शिक्षण विभागातील अधिकारी यांनी शाळेत प्रत्यक्ष किती विद्यार्थी उपस्थित राहतात, याची अचानक तपासणी करण्याचीही गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत बोगसगिरी होत असल्यास दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

जिल्ह्यातील स्थिती

संभाजीनगर तालुक्यातील शाळा ३००

विद्यार्थी: १ ते ५ २२,९७९

विद्यार्थी ६ ते ८ १४,१०७

सोयगाव तालुक्यातील शाळा १४०

विद्यार्थी - १ ते ५ ८,८५२

विद्यार्थी - ६ ते ८ ५,१९६

एकूण दुष्काळगस्त भागातील शाळा ४४०

एकूण विद्यार्थी पात्र ५१,१३४

शाळांकडून कोरडा

शिधा वाटपाचा आग्रह

सद्यःस्थितीत मराठवाड्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. त्यातच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून देण्यासाठीही पाणी मिळत नाही, अशी बिकट अवस्था आहे. जिल्ह्यातील दोन तालुक्यातील शाळांचा यामध्ये समावेश आहे.

तथापि, केवळ पोषण आहारासाठीच शाळेत उपस्थित राहणे विद्यार्थ्यांनाही अडचणीचे ठरू लागले आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना तांदूळ व धान्य आदी वस्तू कोरड्या स्वरूपात वितरीत केल्या होत्या. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना कोरड्या शिध्याचे वाटप करावे, असा आग्रह मुख्याध्यापक, शिक्षकांनी जिल्हा परीषद शिक्षण विभागाकडे धरला आहे. मात्र, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT