stee lindustry  sakal
छत्रपती संभाजीनगर

रशिया-युक्रेन युद्धाचे पोलाद उद्योगावर संकट

कच्चा माल पुरवठा साखळी विस्कळित, आंतरराष्ट्रीय बाजारात दरामध्ये तेजी

सकाळ वृत्तसेवा

जालना : पोलाद निर्मितीसाठी युक्रेनमधून युरोपिय देशांना कच्चा माल पुरविला जातो. मात्र रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या मालाची साखळी तुटली. परिणामी आंतरराष्ट्रीय पोलाद उद्योगाला लागणाऱ्या कच्चा मालाची भाववाढ झाली. सुमारे दोन कोटी टन मेटालर्जिकल कोळसा आयात करणाऱ्या भारतातील पोलाद उद्योगालाही मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोलादचे दर वाढले असून भारतात तीन दिवसांत प्रतिटन दोन ते तीन हजारांनी पोलाद महागले आहे.

भारतातील पोलाद उद्योग हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीने प्रभावित होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतातील पोलाद उद्योगाला लागणारा मेटालर्जिकल कोळसा, आयर्न, युरिअम, मॅंगनीज खनिजासह कच्चा माल (स्क्रॅप) आयात कराला लागतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोहखनिज, कोळशाच्या किमती वाढल्यावर भारतातील पोलाद उद्योगावर परिणाम होतो. कोरोनाचा कठीण काळ संपत नाही तोच रशिया-युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्याने त्याचा परिणाम या उद्योगाला जाणवत आहे.

युक्रेनमधून युरोपिय देशांना मोठ्या प्रमाणावर आयर्न, मॅंगनीजचा पुरवठा होतो. कच्चा मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखळी खंडित झाली आहे. त्यामुळे कच्चा मालाचे भाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टीएमटी पोलादच्या किमतीत वाढ झाली असून सध्या ती प्रतिटन ६५ हजार रुपयांवर गेली आहे. भारतात कच्चा माल इतर देशांतून आयात करावा लागतो. एकूण मागणीपैकी ९५ टक्के आयर्न खनिज आपल्या देशात उपलब्ध होत आहे. मात्र, चार कोटी टन मेटालर्जिकल कोळसा लागतो. त्यापैकी दोन टन कोळशासह अन्य कच्चा माल आयात करावा लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाचे (स्क्रॅप) दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. निर्यातीच्या दरातही वाढ झाली आहे. परिणामी निर्मितीचा खर्च वाढल्याने चार दिवसांपूर्वी भारतातील ५७ हजार रुपये प्रतिटन मिळणारे टीएमटी पोलाद ५९ हजारांवर गेले आहे. अर्थात मूळ किंमत आहे. कर व अन्य खर्च त्यात नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या दरांत दर दोन तासांनी बदल होत आहे.

''युरोपियन देशांना युक्रेनमधून मोठ्या प्रमाणावर आयर्न, अन्य खनिजाचा पुरवठा होतो. युद्धामुळे तो खंडित झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाचे भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले. भारतातील स्टील उद्योगाला २० मिलियन मेटालर्जिकल कोळसा आयात करावा लागतो. त्यामुळे स्टील निर्मितीचा खर्च प्रचंड वाढल्याने तीन ते चार दिवसांत स्टील प्रतिटन दोन ते तीन हजारांनी वाढले आहे. टीएमटी स्टीलचे दर भारतात ५९ हजारांवर तर आंतरराष्ट्रीय बाजारात ६५ हजारांवर गेले आहेत.''

-डी.बी. सोनी, मेटारोल इस्पात, जालना, तथा कार्यकारी सदस्य, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

''आंतरराष्ट्रीय स्टील उद्योगावर युद्धाचा परिणाम झाला आहे. युक्रेनमधून जगभरात दहा टक्के स्टील निर्यात केले जाते. शिवाय नैसर्गिक स्रोत येथे असल्याने स्टील उद्योगाला त्याचा पुरवठा होता. सध्या पुरवठा साखळी कोलमडली आहे. त्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढल्याने स्टीलचे दरही वाढले आहेत.''

-दिनेश राठी, आयकॉन, स्टील, जालना

''आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्टीलच्या दरात तेजी होतीच, त्यात युद्धाची भर पडली. कच्चा मालाच्या दरवाढीसह निर्यातीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्टीलचे दर वाढल्याने भारतातही वाढले आहेत.''

''आंतरराष्ट्रीय बाजारात कोळसा, आयर्न, कच्चा (स्क्रॅप) मालाच्या दरात वाढ झाल्याने स्टीलच्या दरातही वाढ झाली आहे. दोन देशांतील युद्धाचे हे विपरीत परिणाम असून पुढील काळात स्टीलचे दर अधिक वाढण्याची शक्यता आहे.''

-घनश्‍याम गोयल, कालिका स्टील, जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT