मंदिर परिसर sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : उपायुक्तांसह २० अधिकारी-कर्मचारी जखमी

जाळपोळीत पोलिसांच्या वाहनांसह कोट्यवधींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दंगलीदरम्यान समाजकंटकांनी मंदिर परिसर, पोलिसांवर दगडफेक करीत पोलिसांच्या वाहनांनाही लक्ष्य केले. यामध्ये पोलिसांची महागडी वाहने अक्षरशः जळून खाक झाली. जाळलेल्या वाहनांमध्ये विविध पोलिस ठाण्याच्या १२ वाहनांसह, मोटार परिवहन विभागाची दोन महिंद्रा बोलेरोही जाळण्यात आल्या.

यात सार्वजनिक मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यासोबतच दंगलीदरम्यान तब्बल २० पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले. यामध्ये अनेकांच्या डोक्याला, छातीला तर कुणाला पायाला दगडांचा मार लागला आहे.

जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये पोलिस उपायुक्त अपर्णा गीते (मुख्यालय), सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश आघाव, जिन्सी पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, उस्मानपुरा पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सिटी चौकचे सहायक निरीक्षक सुनील कऱ्हाळे,

सिटी चौक आरपीसी अंमलदार शाम साळवे, सिडको आरसीपीचे अंमलदार दीपक हिवाळे, दीपक गडवे, उस्मानपुरा पोलिस नाईक प्रमोद बऱ्हाटे, नियंत्रण कक्ष ‘आरसीपी’ पथकाचे हवालदार एजाज अहेमद, सय्यद कलीम, अंकुश डांगे, शाम पवार, जिन्सी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार पठाण, कॉन्स्टेबल सय्यद फहीम, ईसाक धांडे, सहायक फौजदार कुतूर आदींचा समावेश आहे.

सहायक आयुक्तांच्या वाहनासह ‘आरसीपी’च्या व्हॅन जाळून खाक

समाजकंटकांनी पोलिसांची वाहने जाळल्यानंतर परिसरात आगीचे लोळ उठले होते. यामध्ये सिडको सहायक पोलिस आयुक्तांच्या कारसह जिन्सी ठाण्याचे सुमो, टू मोबाइल व्हॅन, उस्मानपुरा, दौलताबाद, हर्सूल ठाण्याची पीटर मोबाइल व्हॅन, सिटी चौकची पीटर मोबाइल, सिडको सुमो व्हॅन, आरसीपी सिडकोची फायटनर व्हॅन, आरसीपी सिटी चौकचे फायटनर, मोटार परिवहन विभागाच्या दोन बोलेरो,

तसेच आरसीपी कर्मचारी शहेबाज खान यांची दुचाकी आणि महिला पोलिस अंमलदार माया सोनवणे यांची ॲक्टिव्हा दुचाकी जाळण्यात आली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या वाहनासोबतच वाहनातील पीए सिस्टीम, जीपीए, वायरलेस संच, लॉगबूकसह इतर साहित्‍य जळाल्याने अंदाजे अडीच कोटींचे नुकसान झाले. समाजकंटकांनी आरसीपी नियंत्रण कक्षाच्या टाटा मिनी बस, सिटी चौक टू मोबाईल, लाइट व्हॅन, डायल ११२ मार्शल (जिन्सी) आदी वाहनांच्या काचाही फोडल्या.

समाजकंटकांनी पोलिसांची वाहने जाळली, पोलिसांवर दगडफेक केली आहे. सर्वांनी शांतता बाळगावी. समाजकंटकाविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

- डॉ. निखिल गुप्ता, पोलिस आयुक्त, शहर पोलिस दल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही

SCROLL FOR NEXT