Sambhaji Nagar Be careful if you take selfies on Samriddhi highways Action will be taken because of this crime police  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Samriddhi Mahamarg highway: समृद्धी महामार्गांवर सेल्फी काढाल तर खबरदार; 'या'मुळे होईल कारवाई..

दौलताबाद परिसरात पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांना समृद्धी महामार्गांवर चढून सेल्फी काढण्याच मोह सध्या आवरत नसल्याचे चित्र आहे.

सकाळ डिजिटल टीम

दौलताबाद - येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गांवर वाहने थांबून अनेक प्रवासी तसेच छत्रपती संभाजीनगर येथील तरुण सेल्फी काढत असून यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दौलताबाद परिसरात पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांना समृद्धी महामार्गांवर चढून सेल्फी काढण्याच मोह सध्या आवरत नसल्याचे चित्र आहे.

यामुळे महामार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून हे लक्षात घेता महामार्ग वाहतूक पोलिसांनी कुणीही महामार्गांवर थांबून समृद्धीवर फोटो-रिल्स काढल्यास ५०० रुपये दंड आणि एक दिवसाची तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. समृद्धी महामार्गावर काही तरुण फोटो, रिल्स काढण्यासाठी वाहतुकीस अडथळा आणत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर कारवाई होणार

समृद्धी महामार्गांवर वाहन अथवा स्वतः थांबणे चुकीचे आहे. काही ठिकाणी पुलाखाली वाहन थांबवून समृद्धीवर रिल अथवा सेल्फी फोटो काही लोक काढतात.

त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. परंतु खाली वाहन उभे केले. त्यांच्यावर स्थानिक वाहतूक पोलिस अथवा संबंधित ठाण्याने दंडात्मक कार्यवाही करावी, असे महामार्ग विभागाच्या सहायक पोलिस निरिक्षक अरुणा घुले यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Latest Marathi News Updates : प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद

IND vs AUS: विराट धावांचा भुकेला, ऑस्ट्रेलियात दुपटीने वसुली करेल, माजी भारतीय कर्णधाराचा विश्वास

Dhananjay Munde : जातीपातीचा विचार न करता विजयसिंहांना संधी द्यावी; गेवराई येथे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन!

Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?

SCROLL FOR NEXT