Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar  Esakal
छत्रपती संभाजीनगर

Cabinet Meeting: गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या विषयांचं काय झालं? विरोधकांच्या प्रश्नाला फडणवीसांचं सविस्तर उत्तर

छत्रपती संभाजी नगर इथं पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजीनगर इथं मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी मराठवाड्यात घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील विषयांचं आणि घोषणांचं काय झालं? असा सवाल महाविकास आघाडीनं सरकारला विचारला होता. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केलं. (Sambhaji Nagar Cabinet Meeting Devendra Fadnavis given answer to opposition questions)

विरोधकांचं केवळं बोट दाखवण्याचं काम

फडणवीस म्हणाले, "बऱ्याच वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात होत आहे. ही बैठक होत असताना विरोधीपक्षातल्या काही लोकांनी बैठक होऊच नये असा प्रयत्न केला. या बैठकीतून काय मिळणार असाही प्रश्न केला. (Latest Marathi News)

जे स्वतः काहीही करत नाहीत असे लोक केवळ बोटं दाखवण्याचं आणि नावं ठेवण्याचं काम करतात. खरंतर ज्यांनी मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं? असा प्रश्न केला माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे की, तुम्ही अडीच वर्षात काही केलं का?" (Marathi Tajya Batmya)

शेवटच्या बैठकीतल्या घोषणांचं काय झालं?

"४ ऑक्टोबर २०१६ ला मराठवाड्यात शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली होती, त्यात एकूण ३१ निर्णय घेण्यात आले होते. यांपैकी २२ विषय अवगत करण्यात आले होते, तर काही विषयांवर निर्देश झाले होते. या ३१ विषयांचा आढावा २०१७ साली आपण घेतला तेव्हा १० विषयांवरील कार्यवाही पूर्ण झाली होती.

उरलेल्या १५ विषयांवर कार्यवाही टप्प्यात होती तर ६ विषयांवरील कार्यवाही अपूर्ण होती. आज २०२३चा आपण विचार केला तर या ३१ विषयांपैकी २३ विषय पूर्ण झाले आहेत, तर ७ विषय प्रगतीपथावर आहेत. तर एक विषय उद्धव ठाकरेंच्या काळात रद्द झाला," अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजाराचा मूड बदलला; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Latest Maharashtra News Updates : फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल?

Nagraj Manjule : खाशाबा जाधवांवरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळेंविरोधात समन्स

Mumbai: दारु पडली महागात; तीन तरुणांचा मृत्यू, वाचा नक्की काय घडलं?

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

SCROLL FOR NEXT