कृषिमंत्री अब्दुल सत्तार  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत देऊ ; पालकमंत्री संदीपान भुमरे

कन्नड तालुक्यातील विविध गावांमध्ये नुकसानीची केली पाहणी

सकाळ वृत्तसेवा

कन्नड : कन्नड तालुक्यातील जेहूर, निपाणी, औराळा, चापानेर व इतरही भागात गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मंगळवारी (ता.११) पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून एकही शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही दिली.

जेहूर येथील शेतकरी अशोक पवार, निपाणी येथील दत्तात्रेय निकम यांच्या शेतातील कांदा पीक, संजय पवार यांच्या बाजरी पिकाच्या तसेच शिवारातील इतर शेतकऱ्यांच्या शेताला भेट देत नुकसानाची पालकमंत्र्यांनी पाहणी करून त्यांना धीर दिला. यावेळी मंत्री श्री भुमरे म्हणाले की, पिकांनुसार झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. ज्वारी, बाजरी, कांदा, आणि इतर फळपिकांचा समावेश मदतीमध्ये होणार आहे. कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी निपाणी ते औराळा दरम्यानच्या रस्त्यांची देखील पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, कृषी उपसंचालक प्रकाश देशमुख, तहसीलदार संजय वारकड, मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी या दौऱ्यामध्ये उपस्थित होते.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचाही पाहणी दौरा

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनीही या भागात पालकमंत्री भुमरे यांच्या पाठोपाठ नुकसानग्रस्त भागात भेट दिली. चोवीस तासांच्या आत पंचनामे करून शासनाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच नुकसान भरपाई अनुदान देण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी भरतसिंग राजपूत, नितीन पाटील, केतन काजे, छोटू गोसावी आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: अजितदादांच्या खांद्यावर नरेश अरोरांचा हात... मिटकरींचा पक्षाला घरचा आहेर, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली?

Latest Marathi News Updates : इव्हीएमविरोधात लढाईसाठी विरोधकांची रणनीती

Nashik News : नवीन डांबरीकरण झालेले रस्ते खोदाईस मनाई; जुन्या खोदलेल्या रस्त्यांचा मागविला अहवाल

Hasan Mushrif : कागलमधून हसन मुश्रीफ विजयी झाले, पण..; काय सांगते मतदारसंघातील आकडेवारी, घाटगे पोहोचले जवळपास

Rajkumar Rao Fees: स्त्री २'च्या यशानंतर राजकुमार रावने वाढवली फी? ५ कोटींच्या चर्चेवर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT