Aurangabad Municipal Corporation  esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : पालिकेत फुटणार नोकर भरतीचा नारळ

तब्बल ११० पदांसाठी आयबीपीएस एजन्सीची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेची रखडलेली नोकर भरती येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. ११० पदांसाठी सध्या जाहिरात तयार करण्याचे काम सुरू असून, नोकर भरतीसाठी आयबीपीएस या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांत नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले.

महापालिकेचे अनेक अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा शेकडोंच्या घरात आहे. त्यात शासनाने गतवर्षी नवा आकृतिबंध मंजूर केल्याने पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नोकर भरतीची चर्चा सुरू होती. नव्या आकृतिबंधानुसार मंजूर पदांची संख्या ५२०२ एवढी आहे.

त्यापैकी २९६५ इतकेच कर्मचारी कार्यरत आहेत. तर २२३७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर गरजेनुसार भरती करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. १२५ पदे भरण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यासाठी आस्थापना खर्चाच्या मर्यादेला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने वर्ग १ ते ३ मधील निवडक पदेच भरण्याचा निर्णय घेत प्रक्रिया सुरू केली आहे.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त श्री. पाटील यांनी सांगितले की, सध्या बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाने नोकर भरतीसंदर्भात नियुक्त केलेल्या एजन्सीपैकी आयबीपीएस या संस्थेची निवड केली आहे. त्यांनी नोकर भरती करून देण्यास सहमती दर्शविली आहे.

जाहिरातीचा नमुना तयार करून पाठविण्याचे आवाहन संस्थेने केले असून, त्यानुसार जाहिरात तयार केली जात असल्याचे श्री. पाटील यांनी नमूद केले. नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन महिने हे काम चालेल,

असेही श्री. पाटील म्हणाले. राज्य शासनाने नोकर भरतीसंदर्भात एजन्सी अंतिम करताना प्रत्येक पदासाठी विशिष्ट शुल्क ठरवून दिले आहे. त्यानुसार संबंधित एजन्सीला पैसे दिले जातील. ११५ पदे भरण्याचा निर्णय झाला होता, पण यातील पाच लिपिकांची पदे अनुकंपा तत्त्वावर भरण्यात आले असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

अशी आहेत पदे

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : २६

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : ०७

कनिष्ठ अभियंता (विद्युत) : १०

कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) : ०१

लेखापरीक्षक : ०१

लेखापाल : ०२

विद्युत पर्यवेक्षक : ०३

अभियांत्रिकी सहायक : १३

स्वच्छता निरीक्षक : ०७

पशुधन पर्यवेक्षक : ०२

प्रमुख अग्निशमन अधिकारी : ०९

अग्निशमन अधिकारी : २०

कनिष्ठ लेखापाल : ०२

लेखा विभाग लिपिक : ०५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT