Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : जिल्हा भिजला; पाऊस इज बॅक!;दोन दिवसांपासून सक्रिय, जून महिन्याची सरासरी ओलांडली

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपासून दडी मारलेल्या मॉन्सूनच्या पावसाचे पुनरागमन झाले. जिल्ह्यातील सर्वच मंडळे मिळून २४ दिवसांमध्ये एकूण १८२.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारच्या (ता. २४) सकाळी दहापर्यंत गेल्या चोवीस तासांत ९.७ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला.

जिल्ह्यात सात आणि आठ जूनला धो-धो पाऊस पडला. नंतर बरेच दिवस पावसाने दडी मारली. मात्र, रविवारपासून (ता. २३) पावसाचे पुनरागमन झाले. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सर्व १५ मंडळांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली. जूनमधील छत्रपती संभाजीनगर तालुक्याची सरासरी ११४ मिलिमीटर आहे. गेल्या २४ दिवसांत खंड देऊन जरी पडला असला, तरी तालुक्यात १६७.४ मिलिमीटर पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील संभाजीनगर, उस्मानपुरा, भावसिंगपुरा, कांचनवाडी, चिकलठाणा, चित्तेपिंपळगाव, करमाड, लाडसावंगी, हर्सूल, चौका, कचनेर, पंढरपूर, पिसादेवी, शेकटा, वरुडकाझी या १५ सर्कलमध्ये १ ते २४ जूनपर्यंत १६७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातही पावसाने समाधानकारक हजेरी लावली. जून महिन्यातील जिल्ह्याची सरासरी १०७.२ मिलिमीटर आहे. प्रत्यक्षात पावसाची उपस्थिती १८२.९ मिलिमीटर झाली आहे.

साइडड्रेन असूनही जालना रोडवर तळे

जालना रोडवर कोट्यवधी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने चिकलठाणा ते छावणीपर्यंत साइड ड्रेन बांधले आहे. मात्र, जालना रोडवर हॉटेल रामासमोर वारंवार पाणी साचत आहे. छोटा पाऊस झाला तरी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत.

तालुकानिहाय आजपर्यंतचा पाऊस

तालुका सरासरी पाऊस (मिमी)

छत्रपती संभाजीनगर : १६७.०४

पैठण : १८७.०९

गंगापूर : १६३.०६

वैजापूर : २०३.०१

कन्नड : १९८.०५

खुलताबाद : २०२.०३

सिल्लोड : १७०.०१

सोयगाव : १४८.०४

फुलंब्री : २२९.०२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT