Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime: हॉटेलमध्ये सुरु होता देहविक्री व्यवसाय, पोलिसांनी पाच संशयितांना ठोकल्या बेड्या, वाचा नक्की काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा

Latest Cha.Sambhajinagar: शहरातील पैठणगेटसारख्या गजबजलेल्या परिसरात पश्चिम बंगालसह अन्य भागांतून महिलांना आणून सुरू केलेल्या देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी गुरुवारी (ता. २८) रात्री छापा मारला. या ठिकाणाहून दोन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप भिकाजी खाजेकर (वय २४, रा. ता. गंगापूर), राजू सुभाष साळवे (वय २२, रा. नागसेननगर, उस्मानपुरा), विशाल सुरेश भुजंगे (वय ३०, रा. भीमनगर, भावसिंगपुरा), भावेश प्रवीण जाधव (वय २०, रा. रामनगर, हर्सूल), इरफान गफार देशमुख (वय २८, रा. बीड) यांचा समावेश आहे.

याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः पैठणगेट परिसरात असलेल्या अशोका हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून या ठिकाणी व्यवसाय होत असल्याबाबत खात्री केली. डमी ग्राहकाने इशारा करताच हॉटेलवर छापा मारण्यात आला.

या कारवाईत संदीप खाजेकरसह हॉटेलचा मॅनेजर राजू साळवे, रिसेप्शनिस्ट विशाल भुजंगे; तसेच रूमबॉय भावेश जाधव, इरफान देशमुख यालाही ताब्यात घेण्यात आले. या हॉटेलच्या रूम नंबर १०४ मधून वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या.

या कारवाईत पाचही जणांकडून एकूण ८९ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात सहायक फौजदार निवृत्ती साहेबराव गोरे यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील माने करीत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते विधानसभा निवडणूक; मतदान अन् निकालाची सांभाव्य तारीख समोर

Maharashtra Weather Updates: राज्याला पाऊस झोडपणार! जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

Mumbai Rain Video: पावसाच्या सरी अन् विजांचा कडकडाट! मुंबई, नवी मुंबईत मुसळधार; व्हिडिओ व्हायरल

Police Transfers : राज्यातील 'या' आयपीएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या!

Amazon Great Indian Festival 2024 : आजच्या विशेष ऑफर्स आणि सर्वोत्तम डील्स; वाचा एक क्लिकवर

SCROLL FOR NEXT