छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाच्या प्रस्तावित ‘हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात रिक्षाचालकांनी बुधवारी (ता. १०) बंदची हाक दिली. दरम्यान, महावीर चौक येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध करण्यात येणार आहे.
हा कायदा समूळ रद्द करावा, या मागणीसाठी वाहन चालक आक्रमक झालेले आहेत. त्याचाच भाग म्हणून रिक्षाचालकांनी मंगळवार मध्यरात्रीपासून बंदचे आवाहन केले आहे. आठ जानेवारीपासून काही संघटनातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणही सुरू करण्यात आले आहे.
असा असेल मोर्चा
दुसरीकडे महाराष्ट्र वाहतूक सेनेने महावीर चौकातून (बाबा पेट्रोलपंप) मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. हा पायी मोर्चा बुधवारी सकाळी १०.३० वाजता महावीर चौकातून निघणार आहे. मध्यवर्ती बसस्थानक, मिलकॉर्नर, जुबलीपार्क, किलेअर्क, अण्णा भाऊ साठे चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.
आंदोलनामध्ये रुग्णवाहिका सोडून सर्व वाहनांचा चक्काजाम करण्याचा निर्धार रिक्षा संघटनांनी केला आहे. यात लालबावटा रिक्षा युनियन, महाराष्ट्र सेना, ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य परिवर्तन रिक्षा चालक मालक संघटना, भीम सेना ग्रुप, मराठवाडा रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना, वाय. एफ. खान रिक्षा संघटना, न्यू जनता रिक्षा युनियन, रिपाई (ए) रिक्षा युनियन आदी संघटनांचा सहभाग आहे. दरम्यान या बंदला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.