छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात पुन्हा एकदा ‘पाळणा’ हलणार आहे. तीन वर्षांपूर्वी समृद्धी या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर आगामी काही दिवसात ‘गुड न्यूज’ मिळणार आहे. सफारी पार्कचे काम होण्यापूर्वी प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात सध्या १० वाघ आहेत. त्यातील सहा मादी तर चार नर आहेत. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात आतापर्यंत ४० वाघांचा जन्म झाला आहे. महापालिकेने देशभरातील अनेक प्राणिसंग्रहालयाला वाघ दिले आहेत.
एकट्या समृद्धी वाघिणीने डझनभर बछड्यांना जन्म दिला आहे. महापालिकेने १९९५ मध्ये पंजाबच्या सतबीर झूमधून पिवळ्या तर ओरिसातील भुवनेश्वर येथील प्राणिसंग्रहालयातून पांढऱ्या वाघांची जोडी आणली होती.
त्यापासून ४० वाघांचा विस्तार झाला आहे. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात अपुरी जागा आहे. त्यामुळे प्राणी मिटमिटा भागात विकसित होणाऱ्या सफारी पार्कमध्ये पाठविले जाणार आहेत. त्याठिकाणी जागेचा प्रश्न नाही.
म्हणून नर-मादी वाघांना सहवासात सोडण्यात आले होते. त्यानुसार शहरवासीयांना लवकरच गुड न्यूज ऐकायला मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गतवर्षी २५ डिसेंबर २०२१ ला समृद्धी या पिवळ्या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला.
त्यापूर्वी तिने चार बछड्यांना जन्म दिला होता. ती आता तिसऱ्यांदा आई बनणार आहे. महापालिकेने वाघांची एक जोडी नुकतीच गुजरातला पाठविली. त्यापूर्वी मुंबईला एक जोडी पाठविण्यात आली होती.
देशभरात पाठविले ३० वाघ
गेल्या काही वर्षात छत्रपती संभाजीनगर हे वाघ पुरवठादार शहर बनले आहे. आतापर्यंत येथून देशभरातील विविध संग्रहालयांना सुमारे ३० वाघ देण्यात आले आहेत. वाघांच्या जन्मदरासाठी औरंगाबाद प्राणिसंग्रहालय चांगले ठिकाण ठरत आहे. त्यामुळेच देशभरातील प्राणिसंग्रहालयाकडून अधूनमधून औरंगाबादकडे वाघांची मागणी होत असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.