Samruddhi Mahamarg sakal
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’च्या बाजूलाच मिळते दारू! काही ठिकाणी महामार्गालगतची संरक्षक भिंत तोडून उभारले शेड

समृद्धी महामार्गावर घडणाऱ्या अपघातांना कारणीभूत असलेल्या घटकांपैकी नशा करून वाहन चालविणे हे एक आहे. गंभीर म्हणजे, महामार्गालगतच अवैध दारू विक्रीची दुकाने सुरू असून, काही ठिकाणी तर अवैध शेडही उभारल्याचे दिसून आले आहे.

तुषार पाटील

भोकरदन : समृद्धी महामार्गावर घडणाऱ्या अपघातांना कारणीभूत असलेल्या घटकांपैकी नशा करून वाहन चालविणे हे एक आहे. गंभीर म्हणजे, महामार्गालगतच अवैध दारू विक्रीची दुकाने सुरू असून, काही ठिकाणी तर अवैध शेडही उभारल्याचे दिसून आले आहे.

समृद्धी महामार्गाच्या लगत दोन्ही बाजूने संरक्षक भिंत आहे. मात्र, काही स्थानिक गावकरी, अवैध धंदे करणाऱ्यांनी या संरक्षक भिंतीचा काही भाग काढून तेथे अतिक्रमण करून शेड उभारले आहे. त्या शेडमध्ये दारू, सिगारेट व इतर वस्तू विकल्या जातात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. शिवाय येथे काही जणांनी हॉटेलदेखील सुरू केल्या आहेत. या शेडच्या परिसरात बरेचदा ट्रकचालक थांबतात.

त्यांना सहजरीत्या येथे दारू उपलब्ध होते. अनेकदा वाहनधारकांना दमदाटी करण्याचे प्रकारदेखील येथे होतात. या अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक पेट्रोल पंपचालकांनी तक्रारी करूनदेखील अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही! शिवाय समृद्धी महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना सहा महिन्यांपूर्वीच कारवाई करण्याचे पत्र पाठविण्यात आले होते.

पेट्रोलपंपाशेजारी काही नागरिकांनी अतिक्रमणे करून शेड उभारली आहेत. त्यात अवैध धंदे थाटले आहेत. त्यांना काही बोलण्यास गेले तर पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करतात. त्यांच्यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.

- एक पेट्रोलपंप चालक, समृद्धी महामार्ग

प्राधिकरणाने एसपींना लिहिलेले पत्र

समृद्धी महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की कडवंची येथील भारत पेट्रोलपंपाजवळील अतिक्रमणे व अवैध धंद्यांबाबत आपल्या स्तरावरून सदरील अनधिकृत दुकानधारकांना समजविण्यात यावे व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. याबाबत दोन-तीन वेळेस सदरील अतिक्रमण काढण्याच्या प्रयत्न केला आहे.

परंतु, तेथील शेतकरी अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा दुकान मांडत असून, पेट्रोलपंपाजवळ अवैध धंदे थाटत आहेत. तसेच रात्रीच्या वेळे ट्रकचालकांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असून कडवंची येथील पेट्रोलपंपाजवळील अतिक्रमणे त्वरित काढण्यायाकरिता संबंधित पोलिस निरीक्षक यांना आदेशित करावे, तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी त्यांच्यावर कारवाई करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT