Chhatrapati Sambhajinagar Tourism Sakal
छत्रपती संभाजीनगर

National Tourism Day : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास महत्त्वाचा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. या शहराने आपली स्वतंत्र संस्कृती जोपासली आहे.

संदीप लांडगे

- ९८२२५१०५०३

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. या शहराने आपली स्वतंत्र संस्कृती जोपासली आहे. ऐतिहासिक गड-किल्ले, अजिंठा, वेरूळची जगप्रसिद्ध लेणी, धार्मिक स्थळे, जैवविविधतेने नटलेले गौताळा अभयारण्य आहे. यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे दुर्लक्षित आहेत. त्यांचा विकास केल्यास छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रात पर्यटनाचा केंद्रबिंदू बनू शकतो.

पर्यटनामुळे माणूस आपले दैनंदिन व्याप, समस्या सगळे विसरून जातो. त्यामुळेच मानवी जीवनात पर्यटनाला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडी-निवडीनुसार पर्यटनास जात असतो. पर्यटनासाठी तो धार्मिक, नैसर्गिक, ऐतिहासिक, साहसी, पर्यावरणपूरक तसेच कृषी पर्यटनस्थळांची निवड करतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या सर्व प्रकारची पर्यटनस्थळे आहेत.

मात्र, वेरूळ-अजिंठा, दौलताबाद, पैठणसारख्या बोटावर मोजण्याइतपत पर्यटनस्थळांचा अपवाद वगळता इतर अनेक पर्यटनस्थळे पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहेत. तिथे पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे गरजेचे आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे प्रादेशिक राष्ट्रीय पर्यटक अशा पर्यटनस्थळापांसून दूर राहतात. त्याला पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धीच्या अभावासोबत इतरही अनेक घटक जबाबदार आहेत.

यंदा होणार शहरात डबल डेकर बसचे दर्शन

शहरात येणाऱ्या पर्यटकांना शहर दर्शनासाठी विदेशाप्रमाणे डबल डेकर पर्यटन (हाफऑन) बस सुरू करण्यात येणार आहे. येत्या चार महिन्यांत यासंबंधी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे पर्यटन अधिकारी नोमान खान यांनी सांगितले.

शहरातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्याअनुषंगाने पर्यटनाशी संबंधित प्रत्येक घटकांसोबत बैठकांचे सत्र सुरू आहे. यासंदर्भात नोमान खान यांनी सांगितले की, उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेतर्फे प्रथमच पर्यटन धोरण ठरविले जात आहे. त्यात तातडीने करायच्या उपाय-योजना, दीर्घकालीन उपाय-योजनांचा समावेश आहे.

शहरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन दर्शन डबल डेकर बस सुरू केली जाणार आहे. चार ते पाच महिन्यांत याविषयीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय आहे. सिडको भागात बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान विकसित केले जात आहे. त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम केले जाणार आहे. याठिकाणी पर्यटकांनी भेटी द्याव्यात, यासाठी महापालिकेचे प्रयत्न राहतील. त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.

पर्यटनवाढीसाठी हे महत्त्वाचे

  • पर्यटनस्थळांपर्यंत वाहतूक साधनांमध्ये वाढ करणे आवश्यक.

  • पर्यटन क्षेत्राकडे दिशादर्शक फलक लावणे

  • पर्यटन क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करणे

  • ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण थांबविणे गरजेचे

  • पर्यटनस्थळी स्वच्छतागृह, चांगले पाणी, नाश्त्याची व्यवस्था

  • धार्मिक पर्यटनस्थळी पार्किंग, हॉटेलची व्यवस्था

  • पर्यटनस्थळी माहितीविषयक फलक लावावेत

  • मद्यपी, गुंडगिरी व लुटमारीवर नियंत्रणासाठी सुरक्षारक्षक असावेत.

  • अतिगर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, प्रथमोपचार केंद्र असणे आवश्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT