Mudar Loan sakal
छत्रपती संभाजीनगर

Mudar Loan : मुद्रा कर्जाद्वारे महाराष्ट्रात स्वयंरोजगाराला बहर ;वाटपात देशात तिसरा क्रमांक,वर्षभरात ५२ लाख लाभार्थीं

तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान मुद्रा योजना राबवते.

सकाळ वृत्तसेवा

-परवेज खान

छत्रपती संभाजीनगर : तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान मुद्रा योजना राबवते. या योजनेअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते, ते आता २० लाख रुपये करण्यात आले आहे. वर्षभरात (२०२३-२०२४) या वर्षात ‘मुद्रा’ कर्ज घेण्यात उत्तर प्रदेश पहिला, तमिळनाडू दुसरा तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात ७७ लाख लाभार्थींनी ५८ हजार ५३५ कोटी रुपये कर्ज घेतले. तमिळनाडूत ७२ लाख लाभार्थींनी ५७ हजार ३७० कोटी तर महाराष्ट्रात ५२ लाख ८० हजार लाभार्थींना ४२ हजार ७०० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना ‘एमएसएमई’ एक महत्त्वपूर्ण आर्थिक साहाय्य साधन आहे, ज्यामुळे उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक भांडवल मिळू शकते.

कर्जाच्या तीन श्रेणी

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेले कर्ज तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. शिशूअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. किशोर कर्जाअंतर्गत ५० हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते होते. तरुण कर्जाअंतर्गत आतापर्यंत दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते होते. आता ती रक्कम वाढवून २० लाख रुपये करण्यात आली आहे. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत, लहान दुकानदार, लहान उद्योग जसे की, फळ, फूड प्रोसेसिंग युनिट यासारख्या लहान उद्योगांना कर्जाची सुविधा मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र लागते.

छ.संभाजीनगर जिल्ह्यात ४०७ कोटी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षात २६ जुलैपर्यंत ५३ हजार लाभार्थींना ४०७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गेल्या वर्षभरात (२०२३-२४) ला १ लाख ८८ हजार लाभार्थींना चौदाशे ४३ कोटी वाटप करण्यात आले होते.

सरकारने मुद्रा कर्जाची रक्कम वाढवली आहे. मुद्रा लाभार्थींना प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. ज्या मुद्रा कर्जदारांनी कर्ज भरले नाही त्यांनी कर्ज भरून घेणे आवश्यक आहे, अन्यथा ते मिळणार नाही.

- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT