Ratation Sakal
छत्रपती संभाजीनगर

आठवडाभरापासून नागरिकांना मिळेना रेशन, ई-पॉस मशीनचे सर्व्हर बंद; ग्राहकांना होतोय मनस्ताप

स्वस्त धान्य योजनेचे लाभार्थी ग्राहकांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर थंब द्यावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

स्वस्त धान्य योजनेतील धान्य ग्राहकांना देण्यासाठी वापरण्यात येणारे ई-पॉस मशीनचे सर्व्हर तांत्रिक समस्येमुळे आठवडाभरापासून बंद आहे. त्यामुळे जाफराबाद तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

स्वस्त धान्य योजनेचे लाभार्थी ग्राहकांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर थंब द्यावा लागत आहे. परंतु, आठवडाभरापासून सर्व्हरच डाऊन असल्याने ग्राहकांना दुकानात चकर माराव्या लागत आहेत.

जाफराबाद तालुक्यात असलेल्या ११२ स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन फोरजी यंत्रणा असलेल्या ई-पॉस मशीनचे वाटप करण्यात आले. टू जी नेटवर्क असलेल्या मशीन बदलून फोरजी नेटवर्कच्या मशीन दिल्या आहेत. मात्र, महिनाभरापासून यामध्ये अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यामध्ये जवळपास ४० हजार १७९ स्वस्त धान्य दुकानाचे ग्राहक आहेत. यामध्ये अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेत असलेल्या लाभार्थींना धान्याचा पुरवठा केला जातो. जुलै महिन्यात जवळपास ६ हजार क्विंटल धान्याचे नियंत्रण पुरवठा विभागाने केलेले आहे, परंतु या धान्याची नोंद ई-पॉस मशीनमध्ये केल्याशिवाय धान्याचे वितरण केले जात नाही.

तालुक्यामध्ये अंत्योदय योजनेचे ४०६४ शिधापत्रिकाधारक आहेत, तर अन्नसुरक्षा योजनेचे ३४ हजार २९० शिधापत्रिकाधारक ग्राहक आहेत. शिधापत्रिकाधारक असलेल्या संपूर्ण कुटुंबाची ई-केवायसी १५ ऑगस्टपर्यंत करावी, अशा सूचना दुकानदारांना पुरवठा विभागाने दिलेल्या आहेत, परंतु वारंवार सर्व्हरमध्ये येणारा खोडा केवायसीसह धान्य वाटपात अडचणी निर्माण करत आहे.

धान्य वितरण व्यवस्था त्वरित सुरळीत करा

सद्यःस्थितीत संपूर्ण जिल्ह्यातच ई-पॉस मशीनला सर्व्हरमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे धान्याचे नियतन बऱ्याच ठिकाणी थांबले आहे. यामुळे धान्य वितरण व्यवस्था त्वरित सुरळीत करावी व शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप करावे, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.

ई-केवायसीला मुदतवाढ द्यावी

स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनला सर्व्हर डाऊन अभावी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ई -केवायसीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे. याशिवाय जुलै महिन्याचे धान्य वाटपही रखडले आहे. यामुळे या महिन्यात धान्य मिळाले नाही तर पुढच्या महिन्यात ते धान्य दिले जावे, अशीही मागणी होत आहे.

स्वस्त धान्य दुकानदारही अडचणीत

धान्य वितरणासाठी आवश्यक असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये सर्व्हर डाऊनमुळे अडचणी येत आहेत. अनेक वेळा स्वस्त धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारकांत वाद होतात. यामुळे दुकानदारांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. केवायसी करताना अनेक ग्राहकांच्या थंबचा प्रॉब्लेम येतो. कुटुंबातील अनेक सदस्यांचा थंब व्यवस्थित जुळत नाही.

सद्यःस्थितीत ई-पॉस मशीन तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. यामुळे काही ठिकाणी धान्याचे वितरण करता येत नाही. शिधा वाटपासाठी उपयुक्त असलेल्या मशीनमध्ये सर्वच भागांत अडचणी आहेत. दरम्यान, तांत्रिक अडचणीने ज्या शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणार नाही, त्यांना धान्य देण्याची व्यवस्था केली जाईल. केवायसीमध्येही पॉस मशीन बंद असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

- सारिका भगत, तहसीलदार, जाफराबाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

Latest Maharashtra News Updates : १०० टक्के मतदान करण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वोट फॉर रन मॅरेथॉनचं आयोजन

Winter Health : पौष्टिक आहारच वाढवेल प्रतिकारशक्ती

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

SCROLL FOR NEXT