औरंगाबाद - प्रतीकात्मक कावड यात्रा काढून शिवसेनेने परंपरा जपली. 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत शिवसेनेने प्रतीकात्मक कावड यात्रा काढून जपली परंपरा

मधुकर कांबळे

औरंगाबाद : शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने पवित्र श्रावण महिन्यात मागील काही वर्षांपासून हजारो भाविकांच्या सहभागाने कावड यात्रा काढली जाते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. शासकीय नियमांचे पालन करून, परंपरा खंडित होऊ नये, या हेतूने विशेष मोजक्या निमंत्रित भाविकांच्या उपस्थितीत आज रविवारी (ता.२९) प्रतीकात्मक कावड यात्रा काढून शिवसेनेने परंपरा जपली. हर्सूल येथील हरसिद्धी देवीची मातेची शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून येथील पवित्र जलकुंडात जलपूजन करून जल कावड (Jal Kawad)भरून चारचाकी वाहनातून 'बम बम भोले, हर हर महादेव' च्या जयघोष करत ही कावड यात्रा टीव्ही सेंटर, गणेश कॉलनी, गांधी पुतळा, सराफा, मछली खडक, गुलमंडी, औरंगपुरा, नागेश्वरवाडीमार्गे खडकेश्वर महादेव मंदिरात पोहोचली. खडकेश्वर महादेवाला जलाभिषेक करून महाआरती करण्यात आली.

या कावड यात्रेनिमित्त शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी या ही वर्षी कोविडच्या संकटामुळे स्वागत समारंभ, भजन कीर्तन, गर्दी या सर्व गोष्टी टाळून परंपरा खंडित होऊ नये. या उद्देशाने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत कावड यात्रा काढण्यात आली असून देशातून, राज्यातून कोरोनाचा संपूर्णपणे नायनाट होऊ दे व पुढील वर्षी २५ ते ५० हजार भाविकांच्या सहभागाने ही कावड यात्रा होऊ दे, राज्यात सर्वसामान्यांचे जीवन पूर्वीसारखेच पूर्ववत होऊ दे असे महादेवाच्या चरणी साकडे घालून प्रार्थना करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, संजय हरणे, संदेश कवडे, महिला आघाडीच्या सुनिता देव, प्रतिभा जगताप, प्राजक्ता राजपूत, कविता सुरळे, नलिनी महाजन, स्मिता बोंबले, माजी नगरसेवक किशोर नागरे, मीनाताई गायके, रूपचंद वाघमारे, बन्सीमामा जाधव, गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी, संजय लोहिया, प्रकाश कमलानी, प्राध्यापक संतोष बोर्डे, नरेश भालेराव, विश्वनाथ राजपूत, अभिजीत अरकीडवार, जगदीश वेताळ, अरुण गव्हाड, कचरू काथार, प्रशांत भालेराव, मंगेश वाघ, महेश अंबिलवादे, शिक्षक सेनेचे सुधाकर कापरे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT