Raosaheb Danve And Abdul Sattar esakal
छत्रपती संभाजीनगर

सत्तारांचा दानवेंना 'दे धक्का', सोयगावात शिवसेनेचा भगवा

शिवसेनेने ११, तर सहा जागांवर भाजपने विजय मिळविला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोयगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीसाठी (Soygaon Municipal Council Election) आज बुधवारी (ता.१९) मतमोजणी पूर्ण झाली आहे. एकूण चार जागांसाठी मंगळवारी (ता.१८) मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २१ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. मतमोजणीनुसार ११ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बाजी मारली असून तर भाजपने सहा जागांवर विजय मिळविला आहे. अशा एकूण १७ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणूक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) व राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. यात सत्तार यांनी बाजी मारली आहे. हे दोघेही पारंपरिक राजकीय विरोधक आहे. काही दिवसांपूर्वी सत्तार यांनी दिल्लीत दानवे यांची भेट घेतली होती. या प्रसंगी भाजप-शिवसेना युतीवरुन राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. (Shiv Sena WIn Soygaon Municipal Council Election Under Leadership Of Abdul Sattar)

वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या सोयगाव नगरपंचायतीच्या १७ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली आहे. नगराध्यक्ष पदाचीच चर्चा सोयगावात सुरु झाली असल्याने सोयगावात पुन्हा नगराध्यक्षपदावरून राजकीय चर्चांचे गुऱ्हाळ रंगले आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या तेरा जागा (Aurangabad) आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या चार जागा अशा एकूण १७ जागांसाठी अखेरीस सोयगाव नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे. वर्षभरापासून या निवडणुकीची असलेली प्रतीक्षा मंगळवारी संपली आहे. मात्र निवडणूक होताच आता नगराध्यक्षपदाची चर्चा सुरु झालेली आहे. यासाठी मात्र भाजप आणि शिवसेनाच अग्रेसर आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातच राजकीय सारीपाट रंगणार आहे. बुधवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. परंतु त्या आधीच अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप आणि शिवसेनेत नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या चर्चेसह आपलाच नगराध्यक्ष होणार असे दावे प्रतिदावे सुरु झालेले आहे.

विजयी उमेदवार

----

वॉर्ड क्र. 1 शिवसेना - शाहिस्ताबी राउफ विजयी

वॉर्ड क्र. 2 - शिवसेना- अक्षय काळे विजयी

वॉर्ड क्र. 3 - शिवसेना- दीपक पगारे विजयी

वॉर्ड क्र.4 - शिवसेना- हर्षल काळे विजयी

वॉर्ड क्र.5 - भाजप - वर्षा घनगाव विजयी

वॉर्ड क्र.6 - शिवसेना - संध्या मापारी विजयी

वॉर्ड क्र.7 - भाजप - सविता चौधरी विजयी

वॉर्ड क्र.8 - शिवसेना - कुसुमबाई राजू दुतोंडे विजयी

वॉर्ड क्र.9 - शिवसेना- सुरेखाताई काळे विजयी

वॉर्ड क्र.10 - शिवसेना - संतोष बोडखे विजयी

वॉर्ड क्र.11 - भाजप - संदीप सुरडकर विजयी

वॉर्ड क्र.12 - शिवसेना - भगवान जोहरे विजयी

वॉर्ड क्र.13 - भाजप- ममताबाई इंगळे विजयी

वॉर्ड क्र.14 - भाजप आशियाना शाह विजयी

वॉर्ड क्र.15 - भाजप सुलतानाबी देशमुख विजयी

वॉर्ड क्र.16 - शिवसेना - गजानन कुडके विजयी

वॉर्ड क्र.17 - शिवसेना आशाबी तडवी विजयी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT