Spoonshare App sakal
छत्रपती संभाजीनगर

Spoonshare App : एका क्लिकवर कळणार महाप्रसादचे लोकेशन.. ॲप रोखणार अन्नाची नासाडी, संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांचं संशोधन

तंत्रज्ञानाचा अचूक वापर करीत अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी अन्न वाचविण्याचा शाश्वत पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अन्नाची नासाडी रोखण्यासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘स्पूनशेअर’ ॲप तयार केले.

सकाळ वृत्तसेवा

-पृथा वीर

छत्रपती संभाजीनगर : तंत्रज्ञानाचा अचूक वापर करीत अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी अन्न वाचविण्याचा शाश्वत पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अन्नाची नासाडी रोखण्यासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘स्पूनशेअर’ ॲप तयार केले. ‘गुगल सोल्युशन’तर्फे आयोजित स्पर्धेत जगातील १०० संघांमध्ये देवगिरीच्या टीमचा समावेश असून, या टीमला जगातील अंतिम दहामध्ये जाण्याची संधी आहे.

देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीजचे विद्यार्थी कृष्णा आवटे आणि सानिका चव्हाण (कॉम्प्युटर सायन्स - तृतीय वर्ष), मोहम्मद रेहान (एआय मशीन लर्निंग शाखा - तृतीय वर्ष) आणि शुभम पिटेकर (इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलिकम्युनिकेशन - द्वितीय वर्ष) आणि टीमने स्पर्धेत भाग घेतला होता.

गुगल सोल्युशनने शाश्वत विकासाच्या १७ उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट निवडून तंत्रज्ञानाच्या साह्याने शाश्वत पर्याय शोधण्याचे आव्हान दिले होते. देवगिरीच्या टीमने ‘झीरो हंगर’ उद्दिष्ट निवडले. या टीमने तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरातून ‘स्पूनशेअर’ ॲप तयार केले. किचन ते समाजाला जोडणारे ॲप अन्नाची नासाडी रोखण्यासाठी मदतगार ठरू शकते. गरजू व्यक्ती, वसतिगृहातील मुले, कामगार, नोकरीनिमित्त राहणारे व्यक्ती अशा कुणासाठीही हे ॲप उपयुक्त आहे. या निःशुल्क ॲपचे युजर १ हजारहून अधिक असून, आतापर्यंत २०० किलो अन्न योग्य ठिकाणी पोचले आहे.

ॲपची वैशिष्ट्ये

या नवोदित टेक्नोक्रॅट्सनी अन्नाची नासाडी आणि उपासमारीच्या गंभीर समस्येचा अभ्यास केला. कौटुंबिक कार्यक्रमात बरेचदा उरलेले अन्न कुठे द्यायचे, असा प्रश्न पडतो. याचा विचार करून कमी वेळात आणि महत्त्वाचे म्हणजे अन्न खराब होण्यापूर्वी गरजेच्या ठिकाणी पोचावे, अशी या ॲपची रचना आहे. सार्वजनिक कार्यक्रमात महाप्रसाद, भंडारे होतात.

याचीही माहिती मिळणे आवश्यक आहे. स्पूनशेअर ॲपच्या एका क्लिकवर ३० किलोमीटर परिसरातील अशा कार्यक्रमांची माहिती मिळते, जेणे करून कुणीही भंडारे, महाप्रसाद वाटप, अन्नदानासारख्या मोफत भोजनाची सेवा देणाऱ्यांपर्यंत पोचतात; तसेच अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कार्यक्रमाची माहिती ॲपवर मिळते. 

याव्यतिरिक्त व्यक्ती आणि व्यवसायासारखेच विवाह सोहळे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स किंवा इतर कुणीही अतिरिक्त अन्नदान देणारे असतील, तर याचाही अलर्ट यात आहे. विशेष म्हणजे, शिळ्या अन्नाची विल्हेवाट कशी लावावी, बायोगॅस प्रकल्पाला मिथेन गॅस तयार करण्यासाठी लागणारे अन्न कुठून घेता येईल, याचीही माहिती ॲपमध्ये मिळते.

तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही स्पूनशेअर ॲपला अधिकाधिक उपयुक्त करतोय. दरवेळी नवनवीन बदल करताना जास्तीत-जास्त भाषांचा यात समावेश करण्यासाठी आमचे काम सुरू आहे. एका कंपनीने त्यांच्या कॅण्टीनमध्ये निघणारे शिळे अन्न याविषयी आम्हाला संपर्क केला. त्यांना आम्ही महापालिकेसोबत जोडून देणार आहोत. यामुळे बायोगॅसनिर्मितीसाठी मदत होईल.

- कृष्णा आवटे, सदस्य, स्पूनशेअर ॲप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT