Sambhaji Nagar Crime News
Sambhaji Nagar Crime News 
छत्रपती संभाजीनगर

Video: चिमुकल्यानं लंपास केली 33 हजाराची रोकड; वैजापुरातील बँकेत घडला प्रकार

Amit Ujagare (अमित उजागरे)

छत्रपती संभाजीनगर : आपल्या फायद्यासाठी लहान मुलांकडून गुन्हेगारी कृत्ये करवून घेण्याचे प्रकार आता सर्रास पाहायला मिळत आहेत. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका बँकेत घडला आहे. एका साधारण १२ ते १३ वर्षाच्या मुलानं बँकेच्या ग्राहकाची ३३ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचं बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झालं आहे. त्यामुळं आता या मुलाला शोधणं आणि त्याला हे कृत्य करायला भाग पाडणाऱ्या गुन्हेगारांचा शोध पोलीस घेत आहेत.

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूरच्या एका को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये एका चिमुकल्यानं ग्राहकाची तब्बल 33 हजाराची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. चोरी करतानाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हातामध्ये लाल पिशवी घेऊन हा मुलगा बँकेत आला होता. गर्दीचा फायदा घेऊन त्यानं ग्राहकाची रोकड लंपास केली.

या घटनेची माहिती मिळताच वैजापूर शहर पोलीस बँकेत दाखल झाले. मात्र, तोपर्यंत हा चिमुकला तेथून पसार झाला. त्यामुळं सीसीटीव्हीच्या आधारे आता या मुलाचा शोध पोलिसांनी सुरू केला असून लहान मुलांच्या हातून चोरी घडवून आणणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध घेणे हे देखील आता पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran's New President: कट्टरपंथी इराणच्या अध्यक्षपदी पुरोगामी पेझेश्कियान; जाणून घ्या इथून पुढे कसे असणार भारत-इराण संंबंध

Ashadhi Wari : पंढरपुरात राजकीय वातावरण तापलं! राहुल गांधी-शरद पवारांना निंबाळकरांचा विरोध; मोहिते-पाटलांच्या निमंत्रणावरून मोठा वाद

K Armstrong: कोण होते तामिळनाडू बसपा प्रमुख आर्मस्ट्राँग? ज्यांची भररस्त्यात झाली हत्या

Ashadhi Wari 2024 : चांदीच्या मेघडंबरीत विसावली विठुमाउली; नांदेडच्या भाविकाकडून तब्बल 2 कोटी 45 लाखांची चांदी अर्पण

Maharashtra Live News Updates : घड्याळ कुणाचं? 16 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी

SCROLL FOR NEXT