छत्रपती संभाजीनगर

समोरील दृश्याने कुटुंबियांनी फोडला हंबरडा, आवाजाने शेजारी धावले

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद (Aurangabad) येथे औषधनिर्माण शास्त्रचे (डीफार्म.सी) शिक्षण घेणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना विहामांडवा, रामनगर (ता.पैठण) (Paithan) येथे रविवारी (ता.आठ) पहाटे उघडकीस आली आहे. आकाश बाळू वीर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ (Crime In Aurangabad) व्यक्त करण्यात येत आहे. अधिक माहिती अशी, रामनगर (ता.पैठण) येथील शेतवस्तीवरील आकाश हा डीफार्म.सी पदविकेचे (D.pharmacy) औरंगाबाद येथे शिक्षण घेत होता. तो दोन दिवसांपूर्वी गावी आला होता. तोच देवदर्शनाला गेलेले त्याचे आईवडीलही नेमके याच दिवशी आले होते. सायंकाळी सर्वजण सोबत जेवण करून झोपी गेले. रविवारी (ता.आठ) पहाटे घरातील सदस्य झोपेतून उठल्यावर पंख्याला दोरीच्या साहाय्याने आकाशने गळफास घेतल्याने दिसून आले. समोरील दृश्य पाहून कुटुंबियानी हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यानी धाव घेतली.

त्यानंतर आकाशचा पंख्याला लटकलेला मृतदेह खाली घेण्यात आला. या घटनेचा माहिती मिळताच पोलिस कर्मचारी आप्पासाहेब माळी हे घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांच्या मदतीने सदरील मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी विहामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला असता उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल जोशी यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. तसेच उत्तरणीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप उघड झाले नसून या प्रकरणी पाचोड (ता.पैठण) पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पासाहेब माळी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT