लाल भेंडी sakal
छत्रपती संभाजीनगर

करटुल्यानंतर लाल भेंडीची यशस्वी लागवड

साधीपेक्षा मिळतोय लाल भेंडीला दुप्पट भाव

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पारंपरिक पद्धतीने तर शेती सगळेच करतात. मात्र पिकवून तो विकण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा जे विकेल तेच पिकवायचे हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील प्रयोगशील शेतकरी कृष्णा फलके यांनी २० गुंठ्यात लाल भेंडीची लागवड केली आहे. अवघ्या दीड महिन्यानंतर लाल भेंडीचा पहिली तोडणी झाली आणि आता तिसऱ्यांदा तोडणी केली. पारंपारीक साधारण भेंडीच्या तुलनेत लाल भेंडीला दुप्पट भाव मिळत आहे. फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील युवा शेतकरी कृष्णा फलके यांच्याकडे सहा एकर जमीन आहे. ते विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत त्यांनी शेतीत यापुर्वी दोन एकरात करटुले या रानभाजीची लागवड केली.

अतिशय चविष्ट, आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या करटुल्यांचे गेल्या जूनपासून उत्पन्न सुरू झाले असून अद्यापही म्हणजे सात महिने त्यांचे उत्पन्न सुरूच आहे. आता त्यांनी अर्ध्या एकरात लाल भेंडीची लागवड केली आहे. दीड महिन्यांपुर्वी ऑक्टोबरमध्ये अर्धा एकरात लाल भेंडीची लागवड केली. ४५ व्या दिवशी पहिल्यांदा भेंडीची पहिली तोडणी झाली, त्यावेळी ३० किलो तर दुसऱ्यांदा ६० किलो आणि आता तीसऱ्यांदा एक क्विंटलचे पीक आले आहे. दर तिसऱ्या दिवशी अर्ध्या एकरात एक क्विंटल भेंडी निघत असल्याचे कृष्णा फलके यांनी सांगितले. ते म्हणाले, यात रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने फवारणीचा खर्च कमी आहे. सर्वसाधारण भेंडीचा ठोक भाव ३० ते ४० रूपये किलो मिळतो मात्र लाल भेंडीला दुपटीने म्हणजे ६० ते ७० रूपये किलो भाव मिळत आहे. अर्ध्या एकरात ३०० ग्रॅम बियाणे वापरले. लागवडीपासून पहिल्या तोडणीपर्यंत १२ हजर रूपये खर्च झाला, ठिबकने पाणी देतो त्यामुळे पाण्याचेही योग्य नियोजन होते. सध्याच्या ढगाळ वातावरणाचा यावर काहीही परिणाम झालेला नाही. ही भेंडी घेणाऱ्यांना चवदार मिळतात तर शेतकऱ्यांना चांगला भाव देते. औरंगाबादला जाधववाडीत याची विक्री करत असून भाव चांगला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Candidate List: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; बीडच्या सस्पेन्सवर पडदा; 'यांना' दिली उमेदवारी

Latest Maharashtra News Updates : भाजप मुंबईत १८ जागा लढवणार

Shivsena UBT Candidate 3rd List : विधानसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी तीन शिलेदार जाहीर! 'येथे' पाहा तिसरी यादी

मंदार देवस्थळींनी सांगितला 'आभाळमाया'चा सर्वोत्तम सीन, म्हणाले- रात्री ९ वाजता सुधीर घरी येतो आणि...

Kuldeep Yadav ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघातून का वगळलं? खरं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT