औरंगाबाद : औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा करण्याचे प्रयत्न गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू आहेत. काही कंपन्यांकडून औरंगाबादहून कार्गो सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी करण्यात आली. मात्र, अजूनही औरंगाबादसह मराठवाड्यातून किती मालाची वाहतूक होईल, याबाबत माहिती उपलब्ध न झाल्याने, ही सेवा सुरू करण्यात येत नाही.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्याबाबत काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. कार्गो सेवा सुरू करण्यासाठी औरंगाबाद विमानतळाच्या जुन्या इमारतीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याबाबत जागाही निश्चित केलेली आहे. देशांतर्गत कार्गो सेवा ही दिल्लीच्या एका एजन्सीला देण्यात आली होती. याशिवाय आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा विमानतळ प्राधिकरणाकडून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी औरंगाबादसह मराठवाड्यातील उद्योजकांकडून किती शेती माल हा विदेशात पाठविण्यात येतो, किंवा विमानातून दररोज किती मालाची वाहतूक केली जाऊ शकते याबाबात उद्योजकांना अहवाल देण्याचे आवाहन करण्यात आले होते. औरंगाबाद शहरातून शेती उत्पादित माल आणि औषधी कंपन्यांमधील मालाची वाहतूक विमानाद्वारे करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र याबाबत उद्योजकांकडून ठोस माहिती मिळाली नाही.
खासगी कंपनीची चाचपणी
अलास्का कंपनीने औरंगाबादहून कार्गो विमान सेवा सुरू करण्याबाबत चाचपणी केली. औरंगाबादहून थेट कोणत्या देशात माल पाठविण्यात येत आहे. याबाबत माहिती घेतली आहे. या कंपनीकडून अजूनही माहिती संकलित करण्यात येत आहे. मात्र, मालाची शाश्वती मिळत नसल्याने, विमान सेवा सुरू करावी किंवा नाही. याबाबत अडचणी येत असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.
वर्ष २०१८ मध्ये सोळाशे मेट्रिक टन मालाची वाहतूक
औरंगाबाद विमानतळावरून प्रवासी विमानातून सध्या देशांतर्गत कार्गो पाठविला जात आहे. मात्र आंतरराष्ट्रीय कार्गोची वाहतूक झालेली नाही. वर्ष २०१८ मध्ये देशात १६९८ टन मालाची वाहतूक करण्यात आली होती. वर्ष २०१९ मध्ये फक्त १०२ मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली. वर्ष २०२० मध्ये ही वाहतूक ४७६ टन इतकी होती. तर वर्ष २०२१ मध्ये औरंगाबादहून ६७६ मेट्रिक टन माल पाठविण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.