Crime news TET Exam Scam salary of 76 bogus teachers on hold Nanded  sakal
छत्रपती संभाजीनगर

TET Scam : सरकारनं थांबवलं वेतन; शिक्षकांची हायकोर्टात धाव!

या शिक्षकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : TET Scam : महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) घोटाळाप्रकरणी १४ सहशिक्षकांचं वेतन थांबवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यांतील तीन शिक्षकांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. सन २०१९ मध्ये हा गैरप्रकार घडला होता. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (TET Scam Maharashtra Govt stopped salary teachers run to Mumbai High Court)

या घोटाळ्यात नाव आलेल्या १४ सहशिक्षकांच्या शाळांतील मुख्याध्यापकांना वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांनी वेतन रोखण्याचे आदेश दिले होते. यामुळं शिक्षकांच्या वर्तुळात खळबळ उडाली माजली आहे.

घोटाळा झालेल्या यादीत लातूर जिल्ह्यातील ११ शाळांतील १४ कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षण सेवक, सहशिक्षकांचा समावेश असून हे शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत आहेत. या १४ शिक्षकांचे शालार्थ आयडी पुढील आदेश येईपर्यंत गोठवण्यात आले आहेत.

टीईटी घोटाळा काय आहे?

सन २०१९-२० मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. या प्रकरणी घोटळा झाल्याचं समोर येताच पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्यात ७ हजार ८८० उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचं उघड झालं होतं. या प्रमाणपत्रांमुळं ते शिक्षक बनले होते. या बोगस शिक्षकांची यादी नुकतीच परीक्षा परिषदेनं जाहीर केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidates: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, चार उमेदवारांमध्ये कोणाची नावे?

Nita Ambani : नीता अंबानींची मोठी घोषणा! १ लाखांहून अधिक महिला अन् बालकांसाठी कर्करोग,हृदयविकाराचे मोफत उपचार

आणि रणवीरला सेटवरून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं ; हे होतं कारण

Bandra Stampede: "रेल्वे प्रशासनाची बेफिकिरी जिवावर बेतली..."; वांद्रे चेंगराचींगरी दरम्यान पोलीस काय करत होते?

Sinhagad Accident: सिंहगडावरून व्यक्ती २५० फूट खोल दरीत कोसळला

SCROLL FOR NEXT