Chhatrapati Sambhajinagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील आजी- माजी आमदार मतदार संघाच्या बाहेर पडल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या आशा पल्लवी झाल्या आहे.

नवनाथ इधाटे

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे साकडे

फुलंब्री: फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील आजी- माजी आमदार मतदार संघाच्या बाहेर पडल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या आशा पल्लवी झाल्या आहे. त्यामुळे आता ठाकरे गटही मागे राहिला नसून फुलंब्रीच्या जागेवर दावा ठोकून वाटाघाटीत महाविकास आघाडीतच जागेसाठी भिडणार असल्याचे संकेत मिळाले आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्ष नेते तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन ही जागा सोडून घेण्यासाठी साकडे घातले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडेच राहणार की, मित्र पक्षाकडे जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपा व सेनेच्या युतीमुळे या मतदारसंघात शिवसेनिकांना संधी मिळाली नाही. त्यामुळे एक प्रकारचा अन्याय झाला असल्याची भावना उद्धव ठाकरे गटाची शिवसेना व्यक्त करत आहे. महाविकास आघाडीच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यंच्या लोकसभा निवडणुकीत सर्व शिवसैनिकांनी जोमाने काम केले. त्यांचा अशक्य असणाऱ्या लढाईत त्यांना विजय प्राप्त करून दिला. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा फक्त ठाकरे गटाच्या शिवसेनेनेच लढावी अशी मागणी ठाकरे गटाचे शिवसैनिक करत आहे. मागील पंचवीस वर्षांमध्ये भाजपाच्या युतीमुळे आमच्यावर अन्याय झाला आता महाविकास आघाडीमुळे आमच्यावर अन्याय होऊ नये यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेने लढून विधानसभा संघटक अक्षय खेडकर यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची यावेळी अक्षय खेडकर, सोमीनाथ करपे, उमेश दुतोंडे यांनी भेट घेऊन त्यांना साकडे घातले आहे. त्यामुळे ठाकरे गट जागा सोडून घेण्यासाठी महाविकास आघाडीतच भिडणार असल्याचे संकेत पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

फुलंब्रीच्या जागेवर तिन्ही पक्षाचा दावा

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थान येथे राज्यपाल पदी वर्णी लागली. तर त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले डॉ. कल्याण काळे हे खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे फुलंब्रीच्या जागेवर महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट या तिन्ही पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी गटातटात अडकेल की महाविकास आघाडी सावरेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विरोधी पक्ष नेत्यांकडून होणार शर्तीचे प्रयत्न

फुलंब्री विधानसभेची जागा महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडावी यासाठी ठाकरे गटाचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना नुकतेच भेटले. त्यामुळे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटन वाढविण्याच्या सूचना देऊन ही जागा सोडविण्यासाठी मी स्वतः शर्तीचे प्रयत्न करणार असल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT