Accident News sakal
छत्रपती संभाजीनगर

Accident News : बसची ट्रॅक्टरला धडक; एक ठार, १६ गंभीर;सर्व जखमी शेतमजूर हिंगोली जिल्ह्याचे, जालना मार्गावरील दुर्घटना

अहमदनगर येथून निघालेल्या शेतमजुरांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव एसटी बसने पाठीमागून जोराची धडक दिल्याने या झालेल्या भीषण अपघातात १ जण ठार, तर १६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

करमाड : अहमदनगर येथून निघालेल्या शेतमजुरांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव एसटी बसने पाठीमागून जोराची धडक दिल्याने या झालेल्या भीषण अपघातात १ जण ठार, तर १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावर सोमवारी (ता. ३) पहाटे अडीचच्या सुमारास कुंभेफळ येथील एमआयडीसी चौकाजवळ घडली. नूर अब्दुल शेख (वय ४०, रा. मनसुंदरी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, मनसुंदरी (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील शेख कुटुंब शेतीकामासाठी नगर जिल्ह्यात मजुरी करत होते. हे कुटुंब रविवारी (ता. २) सायंकाळी अहमदनगरहून हिंगोलीकडे ट्रॅक्टरने (एमएच १७ एई ७८३२) जात होते. दरम्यान, सोमवारी (ता. ३) पहाटे अडीचच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावर कुंभेफळ येथील एमआयडीसी चौकाजवळ त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून आलेल्या भरधाव पुणे-परतूर बसने (एमएच १४ बीटी ३०२५) जोराची धडक दिली.

यावेळी झालेल्या भीषण अपघातात ट्रॉलीमध्ये बसलेले १७ मजूर रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. याची माहिती मिळताच करमाड ठाण्याचे सपोनि. प्रताप नवघरे, पोउनि. दादासाहेब बनसोडे, शत्रुघ्न मडावी, संतोष टिमकीकर, पोलिस सुनील गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील दोन्ही वाहने मार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तर, जगद्‍गुरू नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेचे चालक बाळू कातखडे यांनी सर्व जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी नूर अब्दुल शेख यांना तपासून मृत घोषित केले असून उर्वरित जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी करमाड ठाण्यात बसचालक बळीराम एरंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .

अपघातातील जखमींची नावे

कनिसाबी शेख (वय ६०), शेख अल्ताफ (वय ३८), रेश्मा शेख (वय ३५), फर्जना शेख (वय ३३), अल्ताफ पठाण (वय २६), आसिफ पठाण (वय २७), नजीमा शेख अस्लम (वय ११), सिमरन शेख अस्लम (वय १०), अंजुम अस्लाम (वय ८), रहीम शेख (वय ६), सनावर शेख (वय १७), नौशाद शेख (वय ११), अल्तमरा शेख (वय ८), रेहान पठाण (वय १३), नूरखॉ पठाण (वय १६).

मदतीची याचना

या अपघातानंतर मजुरांच्या किंकाळ्यांनी रात्रीच्या शांत वातावरणात एकच गलका झाला. ओरडण्याच्या आवाजाने कुंभेफळ आणि परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी मजूर महिला भांबावल्या होत्या, तर काही रक्तबंबाळ मजूर रस्त्यावर मदतीसाठी याचना करत होते.

संतप्त नागरिकांनी फोडल्या बसच्या काचा

अपघात होताच ट्रॉलीतील मजूर रस्त्यावर फेकले गेल्याने रक्तबंबाळ झाले होते, तर एकाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बसवर दगडफेक केली. यात बसच्या काचा फुटल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT