Samriddhi Highway Accident Esakal
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात ठार एकाच कुटूंबातील तिघांचा समावेश; तर लहान मुलाने गमावलं आई-वडीलाचं छत्र

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला

अंकिता खाणे (Ankita Khane)

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये बारा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान बालकाचा देखील समावेश आहे. सैलानी येथील दर्गावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा समावेश असल्याची माहिती आहे.

मध्यरात्री झालेल्या या अपघातामध्ये ठार झालेल्या 12 जणांपैकी राजीव नगर वसाहतीमधील चौघांचा समावेश आहे. त्यात एकाच घरातील तिघांचा समावेश आहे. झुंबर काशिनाथ गांगुर्डे व 58 वर्ष, अमोल झुंबर गांगुर्डे वय 18 वर्षे, सारिका झुंबर गांगुर्डे वय 40 वर्ष राहणार राजू नगर नाशिक अशी एका कुटूंबातील मृतांची नावे आहेत.

तर या अपघातामध्ये एका लहान मुलाने आपले आई-वडील गमावले. तो रडून रडून आई-वडिलांना बोलवत होता. या लहान मुलाची बिकट स्थिती झाली होती.

समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनी एक ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते. त्याच वेळेस मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

अपघातानंतर तत्काळ वाहतूक पोलीस प्रशासनाने मदतकार्य सुरु केले. रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

जखमींची नावे

1) पुजा संदीप अस्वले, वय 35 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक

2) वैष्णवी संदीप अस्वले, वय 12 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक

3) ज्योती दिपक केकाणे, वय 35 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक

4) कमलेश दगु म्हस्के, वय 32 वर्ष, रा. राहुलनगर, नाशिक,

5) संदीप रघुनाथ अस्वले, वय 38 वर्ष, रा. तिरुपतीनगर, जेलरोड, नाशिक

6) युवराज विलास साबळे, वय 18 वर्ष, रा. इंदिरानगर, नाशिक

7) कमलबाई छबु म्हस्के, वय 77 वर्ष, रा. ममदापूर, नाशिक

8) संगीता दगडु म्हस्के, वय 60 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक

9) दगु सुखदेव म्हस्के, वय 50 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक

10) लखन शंकर सोळसे, वय 28 वर्ष, रा. समतानगर, नाशिक.

11) गिरजेश्वरी संदीप अस्वले, वय 10 वर्ष, रा. नाशिक

12) शांताबाई नामदेव म्हस्के, वय 40 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक

13) अनील लहानु साबळे, वय 32 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक

14) तन्मय लक्ष्मण कांबळे, वय 08 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक.

15) सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन, वय 25 वर्ष, रा. वैजापुर

16) श्रीहरी दिपक केकाणे, वय 12 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक

17) सम्राट दिपक केकाणे, वय 06 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक

उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे उपचार घेत आलेले जखमी

(18) गौतम भास्कर तपासे वय 38 वर्षे राहणार गवळणी तालुका जिल्हा नाशिक

19) कार्तिक लखन सोळशे वय पाच वर्ष राहणार समता नगर तालुका जिल्हा नाशिक

20) धनश्री लखन सोळसे वय आठ वर्ष राहणार समता नगर तालुका जिल्हा नाशिक

21) संदेश संदीप अस्वले वय बारा वर्ष राहणार तिरुपती नगर तालुका जिल्हा नाशिक

22) प्रकाश हरी गांगुर्डे व 24 वर्ष राहणार त्रिंबक ताजी नाशिक

23) शंकर (अंदाजे 3.. 4 वर्षाचा मुलगा असून जखमी झाल्याने बोलता येत नाही नाव पूर्ण समजू शकले नाही )

मृतांची नावे

1) तनुश्री लखन सोळसे वय पाच वर्षे राहणार समता नगर नाशिक

2) संगीता विलास अस्वले 40 वर्षे राहणार वनसगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक

3) पंजाबी रमेश जगताप व 38 वर्षे राहणार राजू नगर नाशिक

4) रतन जमदाडे वय 45 वर्ष राहणार संत कबीर नगर वैजापूर

5) काजल लखन सोळसे वय 32 वर्ष राहणार समता नगर नाशिक

6) रजनी गौतम तपासे वय 32 वर्षे राहणार गवळणी नाशिक

7) हौसाबाई आनंदा शिरसाट वय 70 वर्ष राहणार उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक

8) झुंबर काशिनाथ गांगुर्डे व 58 वर्ष राहणार राजू नगर नाशिक

9) अमोल झुंबर गांगुर्डे वय 18 वर्षे राहणार राजू नगर नाशिक

10) सारिका झुंबर गांगुर्डे वय 40 वर्ष राहणार राजू नगर नाशिक

11) मिलिंद हिरामण पगारे वय 50 वर्ष राहणार कोकणगाव ओझर तालुका निफाड जिल्हा नाशिक

12) दीपक प्रभाकर केकाने वय 47 वर्ष राहणार बसवंत पिंपळगाव नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT