to save school teachers union will protest old pension scheme demand chhatrapati sambhaji nagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : शाळा वाचवण्यासाठी करणार राज्यभर आंदोलन; शिक्षक भारतीच्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात सूर

जुनी पेन्शन लागू करण्याचीही मागणी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सरकारने जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे राज्यभरातील शेकडो शाळा बंद होणार असून संबंधित गावातील मुलांच्या हातची शिक्षणाची पाटी कायमची सुटेल. हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर शिक्षक भारती आंदोलन करेल, असे इशारा राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी दिला.

शिक्षक भारतीचा मराठवाडा विभागीय मेळावा रविवारी महसूल प्रबोधिनी सभागृहात झाला. यावेळी नवनाथ गेंड, प्रकाश दाणे, सुभाष महेर, दिनेश खोसे, किशोर कदम, संतोष ताठे, जानकीराम घाडगे, यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी शासन प्रश्न निर्माण करत आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय प्रश्न ज्वलंत असतानाच मुख्यालयाच्या नावाखाली शिक्षकांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे, याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते.

मुख्यालयाची मर्यादा ३० किमी करावी, वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा ग्राह्य धरावी, जुनी पेंशन योजना लागू करावी, पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी द्यावी, शिक्षकांना केवळ शिकवू द्यावे, त्यांची अशैक्षणिक कामे कमी करावी, असे ठराव मेळाव्यात घेण्यात आले.

प्रास्ताविक राजेश भुसारी, सूत्रसंचालन महेंद्र बारवाल आणि संजय बुचड़े यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी नजीर पठाण, मच्छिंद्र भराडे, विजय ढाकरे, अनिल देशमुख, मोहम्मद अझरुद्दीन, प्रवीण संसारे,दिनेश निकम, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, जया गडसिंग, माया म्हस्के, दिपक दराडे चंद्रकांत अडसूळ, विनोद पवार आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT