Chhatrapati Sambhaji Nagar Accident sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : जड वाहतूक करणाऱ्या भरधाव टेंपोने घेतला चिमुकलीचा बळी

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये सात वर्षांच्या चिमुकलीचा जड वाहतुकीच्या टेंपोने घेतला बळी. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बाबा पेट्रोलपंपाच्या उड्डाणपुलाजवळून रस्ता ओलांडत आजीसोबत जाणाऱ्या सात वर्षांच्या नातीला रेल्वेस्टेशनकडून भरधाव वेगाने येणाऱ्या टेंपोने (एमएच-१२, जीटी-२०२२) जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातामध्ये चिमुरडीचा मेंदूच रस्त्यावर पडला. घटना घडताच चालक टेंपो सोडून पसार झाला. ही घटना गुरुवारी (ता. दहा) सकाळी नऊ ते साडेनऊदरम्यान घडली. सोना सुलतान सोळंके (रा. आसेगाव, ता. गंगापूर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेत कर्णपुरा यात्रेत खेळणी विक्रीसाठी आलेल्या गरीब कुटुंबातील चिमुकलीचा जड वाहतूक करणाऱ्या टेंपोने बळी घेतला.

  • बाबा पेट्रोलपंप उड्डाणपूल परिसरात मोठा अपघात

  • यात्रेतील खेळणी विक्रेत्याच्या कुटुंबाचा घाटीत आक्रोश

  • जड वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर

कर्णपुरा देवीची यात्रा मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेत उदरनिर्वाह भागविण्यासाठी अनेक छोटे-मोठे विक्रेते येतात. असेच एक कुटुंब खेळणी विक्रीसाठी (आसेगाव, ता. गंगापूर) येथून कर्णपुरा येथे आलेले आहे.

या कुटुंबातील सुमन इम्रत चव्हाण यांना गुरुवारी सकाळी आंघोळीसाठी जायचे होते. नऊ ते साडेनऊदरम्यान त्या कर्णपुरा मैदानाकडून रस्ता ओलांडत जात होत्या. त्यावेळी त्यांची नात सोना ही सोबत होती. सोनाचा हात धरून आजी सुमन पुढे चालत होत्या. त्याचवेळी रेल्वेस्टेशनकडून भरधाव येणाऱ्या विटांच्या टेंपोची सोनाला जोराची धडकी लागली.

ही धडक इतकी भीषण होती, की त्यामध्ये सोनाचा मेंदू बाहेर पडला. त्यावेळी रस्त्यावर मोठी गर्दी जमली. गर्दीचा फायदा घेत टेंपोचालक तेथून पसार झाला. यावेळी काही काळ वाहतूक जाम झाली होती. पोलिसांनी अपघातस्थळी बॅरिकेड्स लावून

घटनेचा पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच छावणी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन टेंपो जप्त केला. छावणी पोलिसांनी चिमुकलीला घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. दुपारी सव्वादोन ते सव्वातीनदरम्यान सोनाचे शवविच्छेदन करण्यात आले. फरार चालकाविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मृतदेह ताब्यात घेताच फोडला टाहो

सोनाचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. सोनाचे नातेवाईक एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते. उशिरा मृतदेह देण्यात आल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते.

जड वाहने ठरताहेत यमदूत

चिमुकलीला धडक देणारा टेंपो विटांनी भरलेला होता. अपघातानंतर टेंपोचालक पसार झाला. शहरात जड वाहने मोठ्या प्रमाणात धावत असल्याचे चित्र आहे. पोलिस अशा वाहनांवर कारवाई करीत नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही दिवसांपूर्वीच आकाशवाणीवर एक वृद्धेचा जड वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता.

आमची सोन्यासारखी सोना सोडून गेली हो...

‘‘सोना आमची लाडाची होती. लहानग्या भावावर तिचे जिवापाड प्रेम. ती बोलायला लागली की, आम्ही हरखून जायचो. खेळताना-बागडताना ती भान हरपून जायची. आता ती कधीच दिसणार नाही, ही भावनाच सहन होणारी नाही. तिचं अचानक जाणं, म्हणजे आमच्यावर दुःखाचा डोंगरच आहे...’’

मृत सोनाची मावशी पूजा चव्हाण ओक्सीबोक्सी रडत होत्या अन् आपल्या भावना मांडत होत्या.सोनाचे वडील सुलतान सोळंके यांना सोना आणि कार्तिक अशी दोन मुले. सोना सात वर्षांची, तर कार्तिक चार वर्षांचा आहे. वडील सुलतान सोळंके हे मध्य प्रदेशातील ढोलगढ येथे राहतात. आई खेळणी विकून आपला उदरनिर्वाह चालवते, असेही पूजा चव्हाण यांनी सांगितले.

पोलिसाने पैसे मागितल्याचा आरोप

सोनाच्या शवविच्छेदनानंतर घाटीच्या शवविच्छेदनगृहासमोर थांबलेल्या नातेवाइकांना छावणी पोलिस ठाण्यातील एका पोलिस जमादाराने ७०० रुपयांची मागणी केल्याचा आरोप नातलगांनी केला. मृतदेहाच्या पॅकिंगसाठी पैसे लागतात, असे संबंधित पोलिसाने म्हटल्याचे मृत सोना सोळंके हिचे मामा सचिन चव्हाण यांनी सांगितले.

असा प्रकार झाला नाही

दिलीप ठाकूर (पोलिस निरीक्षक, छावणी पोलिस ठाणे) ः आमचे पोलिस कर्मचारी मृतदेहाची पॅकिंग करीत नाहीत. पॅकिंग करणाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. मग हे पैसे कोण देणार? आमचे कर्मचारी देणार का? परंतु, असा प्रकार या घटनेबाबत झालाच नाही. आमचे पोलिस कर्मचारी पैसे मागू शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT