Crime Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : विम्यासाठी ट्रक चोरी गेल्याचा बनाव; पोलिसांना व्यस्त ठेवण्यासाठी ‘जीपीएस’ लावले दुसऱ्या वाहनाला

विमा दावा मंजूर करुन घेण्यासाठी पोलिसांत सळयांसह ट्रक चोरीची तक्रार देत गुन्हा दाखल करणाऱ्या चालकासह साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) बेड्या ठोकल्या.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - विमा दावा मंजूर करुन घेण्यासाठी पोलिसांत सळयांसह ट्रक चोरीची तक्रार देत गुन्हा दाखल करणाऱ्या चालकासह साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) बेड्या ठोकल्या. ही कारवाई ३० जुलैरोजी करण्यात आली. निसार मंजूर शेख (३३, रा. गल्ली क्र. १२, मिसारवाडी) असे आरोपी चालकाचे नाव असून रिजवान आरीफ शेख (२७ , रा. मास्टर कॉलनी, जळगांव) असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. दोघांना अटक करुन एलसीबीने चिकलठाणा पोलिसांच्या हवाली केले.

पोलिसांनी पहूर (जि.जळगाव) येथून गुन्ह्यातील ट्रकसह सळया, मोबाईल असा २५ लाख १३ हजार ५९४ रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी २७ जुलैरोजी आरोपी निसार याने १४ लाख रुपयांचा ट्रक आणि त्यातील ११ लाख आठ हजार ५९४ रुपयांच्या सळया चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेल्याची फिर्याद दिली होती.

त्यानुसार एलसीबी आणि चिकलठाणा पोलिस हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. दरम्यान, एलसीबीचे निरीक्षक संतोष वाघ यांनी फिर्यादी निसारवर बारीक लक्ष ठेवले. निसारनेच त्याच्या साथीदाराच्या मदतीने हा प्रकार केल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यावरुन पोलिसांनी दोघांनाही अटक केली असता, आरोपींनी सळयासह ट्रक पहूर (जि.जळगाव) येथे असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सळयासह ट्रक जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सतीष वाघ यांच्यासह सहायक निरीक्षक सुधीर मोटे, उपनिरीक्षक विजय जाधव, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, लहु थोटे, नामदेव शिरसाठ, संजय घुगे, श्रीमंत भालेराव, जनाबाई चव्हाण, मनिषा चौधरी, रवी लोखंडे, वाल्मीक निकम, दिपक सुरोशे, नरेंद्र खंदारे, विजय धुमाळ, गणेश सोनवणे, आनंद घाटेश्वर, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे, संतोष डमाळे यांनी केली.

अशी लढविली शक्कल

पोलिस या गुन्ह्याचा तपास करण्यात व्यस्त राहावेत, तोपर्यंत आपण पटकन विमा क्लेम मंजूर करुन मिळवू या विचारातून आरोपींनी एक शक्कल लढविली होती. आरोपींनी चोरीचा बनाव केलेल्या ट्रकला बसविण्यात आलेली जीपीएस सिस्टीम काढून दुसऱ्याच वाहनाला लावली, पोलिस ‘जीपीएस’नुसार तपास करतील तोपर्यंत आपण ट्रकचा विमा मंजूर करु, या उद्देशाने हे कृत्य केल्याचीही कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT