twenty five lakh students Error in Aadhaar card 31st August for update aurangabad sakal
छत्रपती संभाजीनगर

पंचवीस लाख विद्यार्थ्यांच्या ‘आधार कार्ड’ मध्ये त्रुटी

राज्यातील स्थिती, विद्यार्थ्यांना कार्ड अपडेटसाठी ३१ ऑगस्टपर्यंत संधी

संदीप लांडगे

औरंगाबाद : राज्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे तब्बल २४ लाख ६८ हजार ५०९ आधार कार्डमध्ये त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख ४८ हजार ४०७ आधारकार्ड पुणे जिल्ह्यात; तर सर्वांत कमी १४१७ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळले. हे सर्व आधारकार्ड ३१ ऑगस्टपूर्वी अपडेट करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व विभागाने दिले. आधारकार्ड अपडेट असेल तर त्यावर संचमान्यता करण्यात येईल, असे आदेश मागील वर्षी होते. परंतु, यातील प्रमुख अडचणी आणि समस्या दूर न होता पुन्हा यंदाच्या शैक्षणिक वर्षात आधारकार्ड अपडेट कामाचे काम सुरू करण्यात आले आहे. १ ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार राज्यात एकूण २ कोटी २१ लाख ३१ हजार ४७२ विद्यार्थ्यांची नोंद पोर्टलवर आहे. त्यापैकी १ कोटी ८८ लाख ५ हजार ९९७ विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आहे.

तर ३३ लाख २५ हजार ४७५ विद्यार्थ्यांची विनाअधार नोंदणी आहे. १ कोटी १० लाख ५८ हजार ५६५ विद्यार्थ्यांची आधार पडताळणी सुरू आहे. त्यात ८५ लाख ९० हजार ५६ विद्यार्थ्यांचे आधार वैध असल्याचे आढळले आहे. तर २४ लाख ६८ हजार ५०९ विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये त्रुटी आहेत. त्यात आधार केंद्रावर सुरुवातीला माहिती भरताना नावात मराठी व इंग्रजी भाषा आद्याक्षर बदल, जन्म तारखेचे केवळ वर्ष, आडनाव, आईवडिलांचे नाव व मूळ टीसीवरील नावे भिन्न असल्याचे आढळले आहे.

  • औरंगाबाद ः २२,६६०

  • जालना ः १३,८८६

  • बीड ः १३,९६७

  • परभणी ः ९,०४०

  • हिंगोली ः ५२,६२१

  • नांदेड ः १,५१,५२५

  • उस्मानाबाद ः ८,०३०

  • लातूर ः ९,८४४

  • नंदुरबार ः ६९,२३९

  • धुळे ः ७४,४८६

  • जळगाव ः १,५३,७११

  • बुलडाणा ः ८५,५२५

  • अकोला ः ४७,७४९

  • वाशिम ः ३४,२६३

  • अमरावती ः १०,८३९

  • वर्धा ः ३४,३८४

  • नागपूर ः १,६३,६४४

  • भंडारा ः ३७,९३३

  • गोंदिया ः ३८,६७८

  • गडचिरोली ः ३,१६८

  • चंद्रपूर ः ६२,०८१

  • यवतमाळ ः १,१२,२४३

  • नाशिक ः १,८९,८७९

  • ठाणे ः १,६०,५६१

  • मुंबई ः ७७,४५६

  • मुंबई २ ः १,५४,७१९

  • रायगड ः ४२,२३०

  • पुणे ः २,४८,४०७

  • नगर ः १,२१,७०८

  • सोलापूर ः ५६,३३१

  • सातारा ः ३३,२२४

  • रत्नागिरी ः १३,२८५

  • सिंधुदुर्ग ः १,४१७

  • कोल्हापूर ः ५०,६९६

  • सांगली ः ४२,८४५

  • पालघर ः ६६,२३५

शालेय शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी लाभाच्या विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्या पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी शिक्षण संचालनालयाने आधार क्रमांक अपडेट करण्याबाबत कळविले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत ऑनलाइन पद्धतीने अपडेट करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनी ही सर्व प्रक्रिया ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करावी.

- अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT