कायगाव (जि.औरंगाबाद) : जुने कायगाव-गंगापूर रोडवर खड्ड्यामुळे झालेल्या रस्ता अपघात स्थळी जखमींना मदतकार्य करून उपचार्थ दवाखान्यात नेताना पोलीस आणि नागरिक. 
छत्रपती संभाजीनगर

खड्डा वाचविण्याच्या नादात दोन दुचाकींचा अपघात, दोघे ठार

जमील पठाण

कायगाव (जि.औरंगाबाद) : जुने कायगाव-गंगापूर राज्यमार्गावर (Gangapur) पडलेला खड्डा वाचविण्याच्या नादात दोन दुचाकींचा समोरासमोर झालेल्या रस्ता अपघातात दोन ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.19) दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली. जुने कायगाव - गंगापूर हा राज्यमार्ग नवीन डांबरीकरण झाल्याने वाहने सुसाट चालतात. या मार्गावर रावसापेपर मिल्स परिसरात (Accident In Aurangabad) एक मोठा खड्डा पडला आहे. तो खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनधारक गोंधळून पडतात. रविवारी गणेशमूर्ती विसर्जन होते. त्यामुळे रोडवर रहदारीने गर्दी होती. दुपारी दोन ते तीन दरम्यान नेवासा (Newasa) तालुक्यातील पाचेगाव येथून कडू दादाभाई पठाण (वय 55) हे आपल्या दुचाकीने (एमएच17 सीके 3008) नातेवाईकसोबत वैजापूरला जात होते.

त्याच दरम्यान गंगापूरहुन कायगावला जाणारे दुचाकीस्वार प्रवीण कृष्णा दारुंटे (वय 35, रा. गंगापूर, धनसिंग राजपूत रा .फुलेनगर) , बंडू तुळशीराम पानकडे (रा. आंबेवाडी सर्व रा. गंगापूर) हे दुचाकीने जुने कायगावला जात होते. कायगाव गंगापूर रोडलगत असलेल्या रावसापेपर मिल्स परिसरात रोडवर पडलेला खड्डा हुकविण्याच्या प्रयत्नात वरील दोन्ही दुचाकीस्वारांचा भीषण रस्ता अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक श्री दुशिंगे व पोलीस हेडकान्स्टेबल विजय भिल्ल पोहोचले. त्यांनी जखमींना प्रथम गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून अमिना अकबर पठाण, अकबर पठाण, कडू पठाण व इतरांना औरंगाबाद घाटीला पोहोचवले. तेथे उपचारादरम्यान कडू दादाभाई पठाण (वय 55, रा.पाचेगाव ता.नेवासा) आणि अकबर पठाण (वय 46, रा.शिवाजीनगर, ता .वैजापूर) यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करित आहेत.

खड्डे बुजवा

कायगाव-गंगापूर रोडवर पडलेला खड्डा संबंधित ठेकेदार ने वेळेवरच बुजविला असता तर हा अपघात झाला नसता.आणि निष्पाप लोकांचा जीव गेलाच नसता, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित ठेकेदार आणि रस्त्याचे अधिकारी यांनी आता तरी लक्ष देऊन या कायगाव-गंगापूर रोडवर पडलेले खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT