Road Accident in Sambhajinagar Jalna Beed esakal
छत्रपती संभाजीनगर

Road Accident : महाराष्ट्रातील 'या' चार जिल्ह्यांत तब्बल दोन हजारहून अधिक जणांनी गमावला अपघातात जीव!

अपघातातील मृतांमध्ये ७० टक्के तरुणांची संख्या असून किरकोळसह गंभीर जखमींमध्येही तरुण अधिक आहेत.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील (Marathwada) छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण), जालना, बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यात २०२२ या वर्षात आणि जानेवारी ते एप्रिल २०२३ (चार महिने) अशा १६ महिन्यांत तब्बल दोन हजार ४३ जणांचा अपघातात (Road Accident) जीव गमवावा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विशेष म्हणजे, या अपघातातील मृतांमध्ये ७० टक्के तरुणांची संख्या असून किरकोळसह गंभीर जखमींमध्येही तरुण अधिक आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर येथील विशेष पोलिस महानिरीक्षक (आय जी) डॉ. चव्हाण यांनी २२ मे रोजी दिली. आयजी पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रथमच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

२०२२ या वर्षात वरील चार जिल्ह्यात एकूण १५६१ जणांनी अपघातात जीव गमावला आहे, यापैकी सर्वात जास्त म्हणजेच बीड जिल्ह्यातील ४६२ जणांचा समावेश आहे, तर छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) ४३७ जणांचा मृतांत समावेश आहे. याशिवाय जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांत एकूण ४८२ जणांचा अपघातात मृत्यू झाला.

यामध्ये बीड १३९ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४६ जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अपघातात चुकीच्या पद्धतीने, भरधाव वेगात वाहन चालविणे (खासकरुन दुचाकी) यामुळे जरी जास्त प्रमाणात अपघात झाले असले तरी ग्रामीण भागातील रस्तेही तितकेच कारणीभुत असल्याचे डॉ. चव्हाण यांनी नमूद केले.

अदखलपात्र गुन्हा म्हणून सोडून देऊ नका

एखाद्या फिर्यादीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर केवळ एनसी (अदखलपात्र गुन्हा) आहे, म्हणून सोडून देऊ नका, फिर्यादी आणि आरोपी असा दोघांनाही गुन्हा दाखल केल्यानंतर २४ तासात बोलावून घ्या, गुन्ह्याच्या तपासाचा भाग महत्त्वाचा आहे, मात्र किमान दोघांनाही समोरा समोर बोलावल्यानंतरही अनेक प्रश्न सुटतील, अशा सूचना त्यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यांना केल्या आहेत.

ग्रामीण भागात (रुरल पोलिसिंग) ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यावर आपला भर असून जमिनीच्या वादातून, गावागावात पुतळे उभारण्यावरुन, स्मशानभुमीच्या जागेवरुन होणारे वाद यावरही काम करणार असल्याचे डॉ.चव्हाण म्हणाले. दरोडा, चोऱ्यांसारखे गुन्हे रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल कार्यक्षम करणार आहे. विशेष म्हणजे पोलिसिंग करताना जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणे हे आपले पहिले काम असणार आहे असेही डॉ. चव्हाण यांनी अधोरेखित केले.

सर्वात जास्त अवैध धंदे बीड जिल्ह्यात

सर्वात जास्त अवैध धंदे हे बीड जिल्ह्यात आहेत. यामध्ये राजकीय पुढाऱ्यांचीही मोठी संख्या आहे यावरील कारवाईसंदर्भात डॉ. चव्हाण यांना विचारले असता, ते म्हणाले की, अवैध धंद्यावर कारवाई करताना जे रेकॉर्डवर येतील त्यांच्यावर कारवाई होणे अटळ आहे, ते पुढारी म्हणून सुटू शकणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

सर्वात कमी गुन्हेगारी धाराशीवमध्ये

गुन्हेगारीमध्ये जालना जिल्हा सर्वात ‘आघाडी’वर आहे, मात्र धाराशिव जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी गुन्हेगारी असल्याचे डॉ. चव्हाण यांनी नमूद केले. सर्व प्रकारच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने प्रत्येक गावागावाचा अभ्यास करत असून ग्रामपंचायतीतील गटबाजी, त्यातून होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, त्यावर स्थानिक पातळीवर निघणारा तोडगा आदिवर काम करण्यास भर देणार असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT