Union Finance Minister Dr. Bhagwat Karad  
छत्रपती संभाजीनगर

सोलर प्रकल्प ‘मविआ’ने नाकारला; भागवत कराड

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी धरणावर एक हजार मेगावॉटचा आणि १० हजार कोटींची गुंतवणूक असलेला फ्लोटिंग सोलर पॅनल प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने नाकारल्याचा आरोप केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बुधवारी केली.

तत्कालीन उद्योग व जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना या प्रकल्पाबाबत पत्र पाठवूनही त्यांनी ‘जायकवाडी’वर सोलर बसू शकत नसल्याचे कळविल्याचा दावाही कराड यांनी केले आहे. शिंदे- फडणवीस सरकारने मात्र हा प्रकल्प मनावर घेतल्याचेही म्हणाले. डॉ. कराड म्हणाले, ‘‘जायकवाडी जलाशय हे आठ ते दहा हजार हेक्टरचे आहे.

या धरणाच्या एक चतुर्थांश भागात फ्लोटिंग सोलर पॅनल बसविण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला होता. तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्र पाठवून सातत्याने पाठपुरावा केला. २८ एप्रिल २०२२ ला जयंत पाटील यांना पत्र दिले.

त्यानुसार त्यांनी या विषयी मुख्य अभियंता तथा सहसचिव आर.आर. शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीने ३० सप्टेंबर २०२२ ला पत्र देऊन फ्लोटिंग सोलर पॅनल ‘जायकवाडी’वर बसू शकत नसल्याचे पत्र दिले. आता सरकार बदलले आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने तातडीने ‘ना हरकत’ (एनओसी) दिली.’’

सरकार फक्त पत्रावर चालत नाही : पाटील

‘‘ मराठवाड्यातील कोणत्याही प्रकल्पाला मी नकार दिलेला नाही. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी खोटे बोलणे बंद करावे.या प्रॉजेक्टबाबत कराड यांनी फक्त पत्र लिहिले होते पण सरकार पत्रावर चालत नाही. केंद्राच्या ‘एनटीपीसी’कडून प्रस्ताव यायला हवा होता मात्र कराड यांनी राज्यसरकारकडे पत्र दिले.

केंद्रीय मंत्री असल्याने आम्ही त्यांच्या पत्राची दखल घेतली व एक समिती गठित केली. एप्रिलच्या शेवटी पत्र आले आणि जूनच्या सुरुवातीला आम्ही समिती गठित केली. त्यामुळे प्रकल्प घालविला हे सांगणे चुकीचे आहे.’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी मांडले.

फ्लोटिंग सोलर पॅनल प्रकल्प उभारल्यास शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. प्रति युनिट ती दोन रुपये दराने मिळेल. धरणातून ३३ टक्के बाष्पीभवन होते. ते थांबेल. प्रदूषणमुक्त पद्धतीने वीज निर्मिती होईल. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमुळेच हे शक्य होईल, असा विश्वास वाटतो.

- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT