sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Verul Ajanta Mahotsav 2024 : वेरूळ-अजिंठा महोत्सव खंडित होणार नाही ; संदीपान भुमरे,छत्रपती संभाजीनगरचे वैभव सर्वदूर पोचेल

‘‘जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीसाठी विकासकामांना आमचे प्राधान्य आहे. सप्टेंबरमध्ये टूर ऑपरेटर्सची परिषद याचाच भाग होती. पैठणच्या उद्यानासाठी निधी मंजूर करण्यात आला. पैठणच्या चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव काही कारणामुळे बंद पडला होता. यंत्रणांच्या समन्वयाने हा महोत्सव पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला. आता हा महोत्सव कधीच खंडित होणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘‘जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीसाठी विकासकामांना आमचे प्राधान्य आहे. सप्टेंबरमध्ये टूर ऑपरेटर्सची परिषद याचाच भाग होती. पैठणच्या उद्यानासाठी निधी मंजूर करण्यात आला. पैठणच्या चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव काही कारणामुळे बंद पडला होता. यंत्रणांच्या समन्वयाने हा महोत्सव पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला. आता हा महोत्सव कधीच खंडित होणार नाही. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि छत्रपती संभाजीनगरचे वैभव सर्वदूर पोचेल’’, असा विश्वास पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शुक्रवारी (ता. दोन) व्यक्त केला.

जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीला प्रोत्साहन देणारा आणि शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे शुक्रवारी सोनेरी महल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर येथे उद्‍घाटन झाले. यावेळी भुमरे बोलत होते.

अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त व महोत्सव समितीचे मार्गदर्शक दिलीप शिंदे, पालिका प्रशासक व वेरूळ-अजिंठा महोत्सव संयोजन समितीचे उपाध्यक्ष जी. श्रीकांत, विभागीय आयुक्त मधुकर आर्दड, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख, प्रसिद्ध नृत्यांगना संध्या पुरेचा, जालना येथील मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, शहराचे माजी पोलिस अधीक्षक हरीश बैजल, महोत्सवाचे समन्वयक अनिल इरावणे, सारंग टाकळकर उपस्थित होते. महोत्सवाचे उद्‍घाटन राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाला.

प्राचीनत्व महत्त्वाचे : कराड

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, ‘‘आपले प्राचीनत्व महत्त्वाचे आहे. आपली संस्कृती वाढवण्याचे काम आपले आहे. केंद्राच्या प्रसाद योजनेतून घृष्णेश्वर मंदिरासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला. मराठवाड्यात देवगिरी किल्ला, वेरूळचे अहिल्यादेवी होळकारांचे तीर्थकुंड आणि ग्लो गार्डन, ज्युबली पार्क येथे लाइट ॲण्ड साउंड शो सादर करण्यात येतील’’, असे डॉ. कराड म्हणाले.

आसनव्यवस्थेचा ज्येष्ठांना त्रास

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी मोठ्या उत्सुकतेने पोचलेल्या रसिकांचा आसनव्यवस्था बघून प्रचंड हिरमोड झाला. जागोजागी अडथळ्यांची शर्यत पार करताना ज्येष्ठ नागरिक प्रचंड रागावले होते. सोनेरी महलच्या परिसरात प्रवेश केल्यावर आसनव्यवस्थेपर्यंत पोचेपर्यंत बॅरीकेट्स लावण्यात आली होती. लोखंडी रॅम्पवरून चढून वर आणि पुन्हा खाली असा मार्ग होता. ही रचना प्रेक्षकांना आवडली नाही.

विशेष म्हणजे स्टेजच्या समोर व्हीआयपींसाठी स्वतंत्र व्यवस्था होती. ती दोन्ही बाजूंच्या प्रेक्षकांना अडचणीची ठरली. त्यामुळे मुख्य मंचाऐवजी बाजूच्या स्क्रीनवरच कार्यक्रम बघावा लागला. दरम्यान, यंदा आसनव्यवस्था ६५०० वरून ८५०० वरून करण्यात आली. महोत्सवासाठी तिकीटही होते. कार्यक्रम उत्तम दर्जाचा असला तरी प्रत्यक्षात निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT