इलेक्ट्रिक बस 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत लवकरच धावणार इलेक्ट्रिक बसेस

मधुकर कांबळे

औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एएससीडीसीएल) (Aurangabad Smart City Development Corporation Limited) वतीने शहरासाठी ५ इलेक्ट्रिक बसेसची (Electric Bus) लवकरच खरेदी केली जाणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी औरंगाबाद शहराने इंटरनॅशनल रेस टू झीरो मोहिमेसाठी स्वाक्षरी केली असून इलेक्ट्रिक बसेसची खरेदी हा मोहीमेचाच एक भाग आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एएससीडीसीएल) वतीने शहरात १०० स्मार्ट बसेस चालवल्या जातात. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त तथा एएससीडीसीएलचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय (IAS Astik Kumar Pandey) यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शहर बस सेवेचा भाग म्हणून इलेक्ट्रिक बस खरेदी (Aurangabad) करण्याची योजना जाहीर केली होती. त्यानुसार यूके पॅक्ट या यूके सरकारच्या कार्यक्रमाद्वारे सोमवारी (ता. २३ ) ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

आरटीआय इंटरनॅशनल, अर्बन मास ट्रान्झिट कंपनी लिमिटेड, ग्रीन ट्री आणि काकीनाडा स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांना इलेक्ट्रिक बस खरेदीमध्ये मदत केली जाते. या कार्यशाळेत वेगवेगळ्या शहरांद्वारे इलेक्ट्रिक बसेस खरेदी आणि चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध मॉडेल्सची माहिती देण्यात आली. तसेच कार्यशाळेत खर्चाबाबत, चार्जिंग स्टेशन सेटअप, विविध एजन्सींशी संलग्नता आणि निविदा प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.औरंगाबाद स्मार्ट सिटी बसचे मुख्य संचालन व्यवस्थापक राम पवणीकर, उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड आणि प्रकल्प सहयोगी ऋषिकेश इंगळे यांनी कार्यशाळेत भाग घेतला. पवणीकर म्हणाले, की एएससीडीसीएल सीईओ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या स्मार्ट सिटी बस सेवेत इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करण्याचा विचार करत आहोत. या प्रशिक्षणामुळे आम्हाला ई बसेस खरेदी करण्यासाठी विविध मॉडेल आणि प्रक्रिया समजण्यास मदत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT