voting esakal
छत्रपती संभाजीनगर

Voting : स्थलांतरामुळे घसरतोय मतदानाचा टक्का; ग्रामीण भागातून सर्वाधिक परिणाम

विविध कारणांसाठी होणारे दुसऱ्या शहरात, राज्यात होणारे स्थलांतर हे मतदानाची टक्केवारी घसरण्याचे प्रमुख कारण आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - विविध कारणांसाठी होणारे दुसऱ्या शहरात, राज्यात होणारे स्थलांतर हे मतदानाची टक्केवारी घसरण्याचे प्रमुख कारण आहे. नोकरी, कामकाज, विवाह आणि शिक्षणाशी संबंधित स्थलांतर हे देशांतर्गत स्थलांतराची प्रमुख कारणे आहेत. स्थलांतरामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांचे सर्वाधिक स्थलांतर दिसून येते.

उच्च शिक्षण, नोकरी, रोजगार हे स्थलांतराचे मुख्य कारण आहे. होते. स्थलांतरित ठिकाणाहून मतदान असणारे मूळ गाव हे दूरवर असल्यास एका सुटीत येऊन मतदान करून परतणे अशक्य असल्याने इच्छा असूनही अनेकांना मतदान करता येत नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरते.

मतदानाचे ठिकाण बदलणे अशक्य

नोकरीच्या गावात मतदान नोंदणी करणे, हा यावरील उपाय असला तरी सध्याच्या कोणत्याही नोकऱ्या कायमस्वरूपी नसल्याने नोकरीचे ठिकाण वरचेवर बदलते. यामुळे मतदानाचे ठिकाण बदलणे अशक्य आहे. त्यामुळे अनेक जण आपले मतदान हे मुळ गावी, मुळ शहराच्या ठिकाणीच राहू देतात. मात्र, मतदानासाठी ते या ठिकाणी येत नाही.

मतदान केंद्रांवर सुविधांचा अभाव

मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यास अनेक वेळा बराच वेळ रांगेत उभारण्याची वेळ येते. काही ठिकाणी सावलीत रांग लागण्याची किंवा जास्त वेळ लागणार असल्याच सुविधा नसल्यामुळे मतदान केंद्रावर बराच वेळ मतदारांना तिष्ठत उभा राहावे लागल्यास त्याचा परिणाम इतर मतदारांवर होतो.

वाढती बेपर्वाई

देशाचे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. मात्र, अलीकडे विशेषतः उच्चशिक्षित व वेलसेटल समाजात लोकशाहीबद्दलची बेपर्वाई वाढत आहे. कुणालाही निवडून दिले तर काय फरक पडतो, अशी मनोवृत्ती बळ घेत आहेत. याला कारण सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांबद्दलची संपत चाललेली विश्वासार्हता हे सुद्धा आहे.

प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न

प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढीसाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. समाजमाध्यमातून जनजागृती केली जात आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्ती मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न करता आहे. प्रशासनाकडून मागील कित्येक दिवसांपासून जनजागृतीवर भर दिला जातोय.

मराठवाड्यातून जास्त स्थलांतर

मराठवाड्यात उन्हाळ्यात ग्रामीण भागात शेतीत कामच नसल्याने अनेक जण पश्चिम महाराष्ट्रात हंगामी कामासाठी जातात. यामध्ये ऊसतोड मजुरांची संख्या ही सर्वाधिक आहे. तसेच उच्च शिक्षण तरुण मुंबई, पुणे तसेच इतर शहरात नोकरीसाठी गेले आहेत. यातील कित्येक जण मतदान करण्यासाठी उदासीनता दाखवतात.

टक्केवारी घसरण्याची प्रासंगिक कारणे

  • सलग सुटीत येणारे मतदान

  • मतदानाचा दिवस लग्नसराईत येणे

  • वाढते तापमान, उकाडा

  • सणासुदीच्या काळात मतदान असणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Chhagan Bhujbal : घड्याळाच्या टिकटिकने तरले भुजबळ..! येवला, लासलगाव, विंचूरसह प्रमुख गावाच्या मताधिक्क्याने विजय सोपा

ST Mahamandal : एसटी महामंडळाला दिवाळीत मिळाले २० कोटींचे उत्पन्न

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

SCROLL FOR NEXT