sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी हवे कल्याणकारी मंडळ

आमदार संजय केळकर यांची विधानसभेत मागणी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सुमारे अडीच लाखाच्या घरात असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशी ठोस मागणी भाजपचे ठाण्याचे आमदार, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार संजय केळकर यांनी विधानसभेत केली. दरम्यान, सरकार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्यासाठी सकारात्मक असून लवकरच त्याबाबत मार्ग काढू, असे आश्‍वासन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केळकर यांना भेटीदरम्यान दिले.

विधानसभेत केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचा हा प्रश्‍न मांडताना सांगितले, की सरकारने सर्वच असंघटीत कामगारांसाठी एकच असंघटीत कामगार मंडळ करून त्यामध्ये छोटीछोटी ३९ आभासी मंडळे केली आहेत. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. यामध्येच वृत्तपत्र विक्रेत्यांचा सहभाग केला आहे.

मात्र, राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकूण संख्या मोठी आहे. अडीच लाखांहून अधिक आहे. सेना-भाजप युतीच्या २०१४ ते २०१९ च्या सरकारच्या काळात वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळावर कामही झाले. कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास समितीही नेमण्यात आली. त्याचा अहवालही शासनास प्राप्त झाला आहे. त्यामध्येही विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाचा उल्लेख आहे.

शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ व्हावे, यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे लढा देत आहोत. शासनाने या मागणीची दखल घेऊन तत्काळ वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना व राज्यातील विक्रेते बांधवांतर्फे करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT