Water Crisis sakal
छत्रपती संभाजीनगर

Water Crisis : सिंचनासाठी पाण्याची तूट भरून काढणे आवश्यक;मराठवाड्याला हवे हक्काचे २६० टीएमसी पाणी

हाराष्ट्र पाच खोऱ्यांत विभागला गेला आहे. यामध्ये मराठवाड्याला हक्काचे २६० टीएमसी पाणी आवश्यक असताना फक्त ५६ टक्केच पाणी मिळते. जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात २३ मोठी धरणे असली, तरी तेथे जवळपास ३४८ लघू बंधारे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र पाच खोऱ्यांत विभागला गेला आहे. यामध्ये मराठवाड्याला हक्काचे २६० टीएमसी पाणी आवश्यक असताना फक्त ५६ टक्केच पाणी मिळते. जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात २३ मोठी धरणे असली, तरी तेथे जवळपास ३४८ लघू बंधारे आहेत. या छुप्या बंधाऱ्यांतूनही मराठवाड्यावर अन्याय केला जात आहे. या जलसंवादात अनेक मागण्या लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यात आल्या.

मराठवाड्यातील पाणी तूट आणि सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींसमोर मागण्या आल्या. या मागण्या मराठवाड्याला (नागपूर करार १९५३ नुसार) महाराष्ट्र सिंचन सरासरीबरोबर आणावयाचे असल्यास सिंचन वाढविण्यासाठी एकूण १५३ टीएमसी व वॉटर ग्रीडसाठी २ टीएमसी (एकूण १५५ टीएमसी) पाणी शासन आदेश २३ ऑगस्ट २०१९ आणि १९ सप्टेंबर २०१९ नुसार कोकण खोऱ्यातून स्थलांतरित करण्यासाठी त्वरित कार्यवाही आवश्यक आहे. शिवाय ३४ टीएमसी विदर्भ व ५१ टीएमसी कृष्णा खोऱ्यातून असे एकूण कमीत-कमी २४० टीएमसी पाणी वळविणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील जायकवाडीच्या वर जास्तीत-जास्त ४५ टीएमसीची धरणे नाशिकमध्ये बांधली आहेत.

तेवढे पाणी (कमीत-कमी ३० टीएमसी) कोकण विभागातून वैतरणा-मुकणे धरणांमार्फत मराठवाड्यास जायकवाडी धरणासाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे. म्हणजे दोन्ही विभागांत समन्यायी पाणीवाटप होण्यास मदत होईल. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना यशस्वी होण्यासाठी नाशिक येथील धरणास पाइपद्वारे जोडून मराठवाड्यात राबविणे काळजी गरज आहे. प्रादेशिक वैधानिक विकास मंडळे पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील मागास भागास न्याय देण्यासाठी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ त्वरित कार्यान्वित करणे आवश्यक आहे.

६५ टक्क्यांचा निर्बंध उठवा

शासनाने वर्ष २०१० पासून दरवर्षी अमरावती विभागास अनुशेष अनुदान दिले. आजपर्यंत ९ हजार १४८ कोटी दिले. त्यानुसार मराठवाड्यास विशेष अनुदान मिळणे आवश्यक आहे. कमीत-कमी ५०० कोटी प्रतिवर्षासाठी आणि मागील दहा वर्षांचा हिस्सा हा ९ हजार १०० कोटी रुपयांचा होतो. मराठवाड्यात उपलब्ध होणारे पाणी समन्यायी पद्धतीने वाटप होण्यासाठी, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठित करावी. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांनी त्यांच्या १९ सप्टेंबर २०१४ च्या आदेशात जायकवाडी धरणात घातलेल्या ६५ टक्क्यांचा निर्बंध उठविण्यात येऊन ऊर्ध्व भागातील धरणे व जायकवाडी धरणात समान टक्केवारीत पाणी सोडण्यात यावे.

महाराष्ट्र, मराठवाड्यातील आजची स्थिती

  • मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी ५३ तालुके अवर्षणप्रवणग्रस्त आहेत. त्याची टक्केवारी ७० एवढी आहे.

  • महाराष्ट्रात एकूण वापरासाठी लवादानुसार अनुज्ञेय पाणी ४,१०५ टीएमसी.

  • मराठवाड्यातील लवादानुसार अनुज्ञेय पाणी ३३६ टीएमसी (८ टक्के).

  • मराठवाड्यात सध्या नवीन प्रकल्प घेण्यासाठी उपलब्ध पाणी - ४ टीएमसी.

  • येत्या २० वर्षांत महाराष्ट्र सिंचन सरासरीबरोबर आणण्यास मराठवाड्यासाठी इतर भागांतून वळते करावे लागणारे पाणी २६० टीएमसी.

  • कोकण विभागातून नवीन प्रकल्पासाठी पाणी वळते करणे- १२५ टीएमसी.

  • जायकवाडी तूट भरून काढण्यासाठी लागणारे पाणी - ३० टीएमसी.

  • कोकण विभागात दमणगंगा, नारपार, पिंजाळ, वैतरणा, उल्हास उपखोऱ्यात आज रोजी उपलब्ध पाणी- ४४० टीएमसी.

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्यासाठी असणारे हक्काचे पाणी

  • कृष्णा खोरे लवादानुसार एकूण उपलब्ध पाणी- ६६६ टीएमसी.

  • मराठवाड्याचे कृष्णा खोऱ्यातील क्षेत्र ८.४० टक्के.

  • मराठवाड्याचा पाणी हिस्सा - ५५.९० टीएमसी.

  • मराठवाड्याला आजपर्यंत पाणीवापर - २५.४ टीएमसी.

  • कृष्णा खोऱ्याचे मराठवाड्यासाठी मिळविण्याचे उर्वरित पाणी - ३० टीएमसी.

  • गोदावरी खोऱ्यातून पोलावरम प्रकल्प (आंध्र प्रदेश) द्वारे कृष्णा खोऱ्यासाठी दिलेले महाराष्ट्राचे पाणी - १४ टीएमसी.

  • त्याबदल्यात कृष्णा खोऱ्यातून महाराष्ट्राला पर्यायाने गोदावरी खोऱ्याला उपलब्ध होणारे पाणी - १४ टीएमसी.

  • एकूण कृष्णा खोऱ्यातून दुष्काळी मराठवाड्यासाठी वळविण्याचे पाणी - ५१ टीएमसी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT