राज्यभरात वाढत्या तापमानासोबत दुष्काळी झळाही तीव्र झाल्या आहेत. पाणीसाठा खाली गेला असून जलस्रोत आटत चालेल आहे. Sakal
छत्रपती संभाजीनगर

Yavatmal News : पाणीटंचाईने धारण केले उग्ररूप; सात जिल्ह्यांत सतराशे टँकर , मराठवाड्यात भयावह स्थिती

राज्यभरात वाढत्या तापमानासोबत दुष्काळी झळाही तीव्र झाल्या आहेत. पाणीसाठा खाली गेला असून जलस्रोत आटत चालेल आहे.

चेतन देशमुख

यवतमाळ : राज्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले असून एकट्या छत्रपती संभाजीनगर विभागात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. या विभागातील सात जिल्ह्यात एक हजार ७२८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे या भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. विदर्भात बुलडाणा जिल्हा सोडल्यास अन्यत्र स्थिती चांगली आहे.

राज्यभरात वाढत्या तापमानासोबत दुष्काळी झळाही तीव्र झाल्या आहेत. पाणीसाठा खाली गेला असून जलस्रोत आटत चालेल आहे. यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ राज्यातील २३ जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे.

सद्यःस्थितीत दोन हजार ७७९ गावे तसेच सात हजार १४८ वाड्यांना तीन हजार ४५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळाची सर्वाधिक दाहकता छत्रपती संभाजीनगर विभागात तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात आहे.

शहरात राज्यातील सर्वाधिक ६५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जालना, बीड, परभणी, धाराशीव, लातूर तसेच नांदेड या भागातही टंचाईचे चटके नागरिकांना बसत आहे. इतर विभागाच्या तुलनेत विदर्भाची स्थिती चांगली आहे. अवकाळी पावसाची सातत्याने असलेली हजेरी यामुळे टंचाईची तीव्रता कमी आहे. विदर्भातील बुलडाणा जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात टँकरची संख्या फार कमी आहे.

जिल्हा- टँकर

ठाणे -४५

रायगड- ४३

रत्नागिरी -१२

पालघर -४९

नाशिक -३५२

धुळे- ८

जळगाव -९७

नगर -३१९

पुणे -२२९

सातारा- १९९

सांगली -१०७

सोलापूर -१७९

संभाजीनगर -६५६

जालना- ४९०

बीड -३९९

परभणी -१४

नांदेड -१६

धाराशीव -१३२

लातूर -२१

अमरावती -१३

बुलडाणा -५९

यवतमाळ -०८

नागपूर - ११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT