sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये बिघाड;तीन तास बंद पडला पाणीउपसा

पाणीउपसा तीन तासांनंतर पूर्ववत झाला. त्यामुळे शहरात पाण्याच्या वेळापत्रकाचे तीनतेरा झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्यावरील विघ्न कायम आहे. ७०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला लागलेली गळती बंद करण्यासाठी घेतलेला १० तासांचा शटडाउन तब्बल २४ तासांनंतर संपला. त्यामुळे जुन्या शहरात १२ दिवसांनंतर मंगळवारी (ता. दोन) पाणी मिळाले. त्यानंतर अवघ्या काही तासांत फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राची वीज गूल झाली. पाणीउपसा तीन तासांनंतर पूर्ववत झाला. त्यामुळे शहरात पाण्याच्या वेळापत्रकाचे तीनतेरा झाले आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० व १२०० मिलिमीटर व्यासाच्या दोन्ही पाइपलाइनचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे पाइप फुटण्यासोबतच विविध तांत्रिक बिघाड सुरूच आहेत. प्रत्येक महिन्यात किमान दोन-चार वेळेस तांत्रिक बिघाड निर्माण होतो. त्यात ७०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनवर पाच ठिकाणी मोठ्या गळत्या लागल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने सोमवारी (ता. एक) १० तासांचा शटडाउन घेतला. पण, प्रत्यक्षात हे काम तब्बल २३ ते २४ तास चालले. मंगळवारी सकाळी हे काम संपले. त्यामुळे जुन्या शहरातील अनेक भागांना रात्री उशिरा १२ दिवसांनंतर पाणी मिळाले.

विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे रात्री ९.४५ ते १०.४० वाजेदरम्यान फारोळा जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या उपकेंद्रातील ३३ केव्ही क्षमतेच्या विद्युतवाहिनीत तांत्रिक बिघाड झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन जलशुद्धीकरण केंद्राची यंत्रणा बंद पडली. म्हणून जायकवाडी धरणातूनही पाणीउपसा बंद करण्यात आला. परिणामी शहराला नियोजित पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान, दुरुस्तीनंतर पाणीउपसा पूर्ववत सुरू करण्यासाठी तब्बल तीन तासांचा वेळ लागल्याचे यांत्रिकी विभागाचे प्रमुख डी. के. पंडित यांनी सांगितले.

पहाटे आले नळाला पाणी

पाण्याचे टप्पे देण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची धडपड सुरू होती. बुधवारी पहाटे दोनपर्यंत जुन्या शहरातील वसाहतींना पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे नागरिकांना थंडीत रात्र जागून काढावी लागली. एकीकडे जुन्या शहरातील नागरिकांचे हाल सुरू असताना नव्या शहरातील पाणीपुरवठा लांबणीवर पडला आहे. कधी तांत्रिक बिघाड तर जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होतो. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

शटडाउनमुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवस उशिराने सुरू आहेत. तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. जिन्सी, संजयनगर भागातील वसाहतींना मंगळवारी रात्री उशिरा पाणीपुरवठा करण्यात आला. इतर भागातही पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

— के. एम. फालक,

कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT