Water Supply sakal media
छत्रपती संभाजीनगर

जालना : पालिकेकडेच थकली चार कोटींची पाणीपट्टी

जालना : जायकवाडी पाटबंधारे विभागाने पाठविले पत्र, पाणीपुरवठा खंडित होण्याची स्थिती

सकाळ वृत्तसेवा

जालना : पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून जालना शहरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या पाणी पट्टीसह दंडापोटी तीन कोटी ९८ लाख ९८ हजार रुपयांची थकबाकी झाली आहे. शिवाय २०२० पासून कराराचे नूतनीकरणही झाले नाही. परिणामी आता थकीत पाणी पट्टी न भरल्यास जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून पालिकेचा पाणी पुरवठा खंडित केला जाणार असल्याचे पत्र नगरपालिकेला दिले आहे.

जायकवाडी प्रकल्पातून जालना व अंबड शहराला पाणी पुरवठा होता. हा पाणी उपसा घरगुती,औद्योगिक प्रयोजनासाठी बिगर सिंचन मंजूर पाणी आरक्षणाच्या प्रमाणात करारनामा करणे बंधनकारक आहे. मात्र, जालना नगरपालिकेने नोव्हेंबर २०१४ मध्ये केलेल्या करारनाम्याची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये संपुष्टात आली आहे. तरी देखील अद्यापि करारनामा नूतनीकरणासाठी नगरपालिकेने कोणतेही पावले उचलली नाहीत. यासंदर्भात जायकवाडी पाटबंधारे विभागाने जालना नगरपालिकेला वारंवार पत्र व्यवहार केला आहे.

जालना -अंबड शहर पाणीपुरवठा करणाऱ्या योजनावरील पाणीमापक यंत्र नादुरुस्त आहे. त्यामुळे पाणीमापक यंत्र तात्काळ दुरुस्त करून घेण्यासाठी जालना नगरपालिकेला कळविण्यात आले आहे.

मात्र, जालना नगरपालिकेने काहीच हलचाली केल्या नाहीत. त्यामुळे जालना नगरपालिकेकडे जायकवाडी जलाशयाची जानेवारी २०२२ अखेर पाणीपट्टी थकबाकी व दंड अशी एकूण तीन कोटी ९८ लाख ९८ हजारांची रक्कम थकीत आहे.

ही रक्कम ता.पाच मार्चपर्यंत अदा करून करारनामा नूतनीकरण करून घ्यावे. तसेच पाणीमापक यंत्र दुरुस्ती करावे, अन्यथा जालना-अंबड पाणीपुरवठा योजनेचा जायकवाडी जलाशयातून सुरु असलेला पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येईल, असे पत्र जायकवाडी पाटबंधारे विभागाने जालना नगरपालिकेला दिले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने वेळेत पाणी पट्टी भरली नाही, तर भराचा पाणी पुरवठा मार्च महिन्यांत बंद होण्याची शक्यता आहे.

विविध टप्प्यांत कार्यवाही

जालना नगरपालिकेने पाणीपट्टीची थकबाकी ता. पाच मार्चपर्यंत भरली नाही, तर जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून ता.साच मार्च २०२२ रोजी दोन तासांकरिता, ता. आठ मार्च २०२२ रोजी चार तासांकरिता, ता. नऊ मार्च २०२२ रोजी सहा तासांकरिता, ता. दहा मार्च २०२२ रोजी आठ तासांकरिता व ता.११ मार्च २०२२ रोजी संपूर्ण पाणी उपसा बंद करण्यात येईल, असे जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जायकवाडी जलाशयातून नगरपालिकेकडून पाणी घेतले जाते. ही पाणीपट्टी भरणे बाकी आहे. थकबाकी टप्प्या टप्प्यांने भरण्यास मुभा द्यावी अशी विनंती जायकवाडी पाटबंधारे विभागाकडे केली जाईल.

-नितीन नार्वेकर मुख्याधिकारी, नगरपालिका,जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EXIT POLL: एक्झिट पोल आले! बहुमत कोणाला? महाविकास आघाडी की महायुती?

IND vs AUS: विराटवर शरीरवेधी मारा करा... कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी विकेटकिपर नक्की काय म्हणाला?

मतदानासाठी शेवटचे १५ मिनिटे शिल्लक! सोलापूर जिल्ह्यात ५७.०९ टक्के मतदान; दक्षिण सोलापूर, शहर मध्य व शहर उत्तर या ३ मतदारसंघात सर्वात कमी मतदान

Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान वादात ICC चं मरण, कायदेशीर कारवाईची टांगती तलवार; जाणून घ्या नेमकं कारण

Maharashtra Election: राज्यभरात मतदान केंद्रांची तोडफोड, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; जाणून घ्या कुठे काय घडलं?

SCROLL FOR NEXT