छत्रपती संभाजीनगर : अख्खा जून महिना संपला तरी जोरदार पाऊस न झाल्यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. रविवारी (ता.२) शहराला आर्द्राच्या पावसाने चांगलेच झोडपल्याने शहरात जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले. अनेक घरांसह अपार्टमेंटमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले.
रविवारी (ता.३) दुपारपर्यंतच्या ऊन सावल्यांच्या खेळानंतर दुपारी चारनंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जवळपास दिड तास धुवाधार पाऊस झाला. त्यानंतरही रात्रीपर्यंत हलका पाऊस सुरूच होता.
दरम्यान, दुपारच्या पावसामुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले तसेच काही अपार्टमेंटमध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला.
शहरात सिमेंटच्या रस्त्यांवरून धो धो पाणी वाहत होते. रस्त्यांवर दुभाजकांचे प्रमाण वाढल्याने पाण्याला वाहून जाण्यासाठी वाट मिळत नव्हती.
त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातून दुचाकी वाहनधारकांना वाट काढताना अडचणी आल्या तर काहींच्या दुचाकीत पाण्यामुळे बंद पडल्याने काही दुचाकीधारक वाहने ढकलत जाताना दिसत होते. रात्री बराच वेळ पाऊस सुरू होता. काही ठिकाणी चारचाकी वाहनांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागली.
भर पावसात अग्निशामक दलाचे काम
रविवारी सिमेंटचे रस्ते जलमय झाले होते. तसेच रस्त्यालगतची घरे उंचावर अन् घरे खाली झाल्याने तसेच साइड ड्रेन तयार करण्यात आले नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
शहरातील नंदनवन कॉलनी, पेठेनगरातील दोन घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तर काल्डा कॉर्नर येथील वैष्णवी अपार्टमेंट, मिलिंद कॉलेजसमोरील एका हॉटेलमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला. यावेळी भर पावसात अग्निशामक दलाच्या जवानांनी घरात तसेच अपार्टमेंटमध्ये शिरलेले पाणी काढून दिल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गारठा वाढला
रविवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत झालेल्या पावसाची चिकलठाणा वेधशाळेने ३९.४ मिलीमीटर पावसाची नोंद केली आहे. वातावरणातील आर्द्रता ९७ टक्के झाल्याने वातावरणात गारठा चांगलाच वाढला.
अन् रस्ता मोकळा केला
शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक गुलमोहरच्या झाड रस्त्यावर पडला आहे असा अग्निशामक विभागाला फोन आला. तात्काळा एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि झाड रस्त्याच्या बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.