Weather update Rain forecast Heavy rain in Aurangabad Jalna sakal
छत्रपती संभाजीनगर

Weather update : औरंगाबाद, जालन्यात जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ऑगस्ट कोरडा गेल्यात जमा असताना या महिन्याच्या अखेरच्या दिवशी, बुधवारी दुपारी शहर व परिसरात सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला. शहराच्या काही भागाला पावसाने झोडपून काढल्याने तासाभरात रस्ते जलमय झाले. गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या, मूर्ती मंडपात आणण्यासाठी गेलेल्या मंडळांच्या सदस्यांची तारांबळ उडाली.

शहर परिसरात सुमारे २५ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आज प्रचंड उकाडा जाणवत होता. सिडको एन तीन व परिसरात दुपारी मुसळधार पाऊस झाला. क्रांती चौकापासून पलीकडील भागात सायंकाळी जोरदार पाऊस झाला तर अर्धे शहर कोरडे होते. एमजीएम विद्यापीठाच्या वेधशाळेत ४१.१ तर चिकलठाणा येथील वेधशाळेत १७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जालन्यात दमदार हजेरी

दीर्घकाळ दडी मारलेल्या पावसाने आज विजांच्या कडकडाटासह शहरात जोरदार हजेरी लावली. सव्वा ते दीड तास पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरूच होती. अंबड शहर, अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरातही पाऊस झाला.

वीज पडून महिला ठार, तिखे जखमी

बीड : सुमारे २५ दिवसांच्या खंडानंतर आज सायंकाळी जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. बीड शहर व परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. केज तालुक्यातील काळेगाव येथे आत्माराम माणिक आगे, अन्नपूर्णा आत्माराम आगे, रामरतन चंद्रकांत आगे व शीला रामरतन आगे या शेतात असताना वीज कोसळली. त्यात शीला आगे यांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Youtube Shorts Update : आता तुम्हीही बनू शकता यूट्यूबर; शॉर्ट्समध्ये भन्नाट अपडेट; आता तब्बल 3 मिनिटांचे व्हिडिओ बनवता येणार

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना, पण हरमनप्रीत कौरची टीम आज हरली तर काय होणार? जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार

चलाख, Rishabh Pant! वर्ल्ड कप फायनलमध्ये लढवलेली शक्कल रोहित शर्माने सांगून टाकली Video

काँग्रेसकडेही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी झुंबड; पक्षनिरीक्षक १० ऑक्टोबरपर्यंत प्रदेश कमिटीकडे अहवाल देणार

Sant Gadgebaba Gram Swachhta Abhiyan Awards: गट-तट विसरून, राजकारण न करता गावे आदर्श करा : डॉ. प्रवीण गेडाम

SCROLL FOR NEXT