औरंगाबाद : गेल्या चोवीस तासात सोशल मिडियावर नवीन 'ट्रेंड' सुरु झाला आहे. त्या ट्रेंडचे नाव आपल्या सर्वांना अर्थातच माहित आहे. ते म्हणजे (#Couple challenge) 'हॅशटॅग कपल चॅलेंज'. फेसबुक ओपन केले तर प्रत्येकाच्या फेसबुक अकाउंटवर हॅशटॅग कपल चॅलेज असे लिहून (पती-पत्नी) जोडीसमवेत फोटो शेअर केलेला दिसेल.
या नवीन ट्रेंडने सर्वांच्या मनाला भुरळ घातली असून या ट्रेंडने अवघ्या काही तासांमध्ये सोशल मिडियात हवाच केली की. तर दुसऱ्या बाजूने या नवीन ट्रेंडला उत्तर देण्यासाठी लग्न न झालेल्या गटातील युवकांनी 'सिंगल चॅलेंज' (#Single challange) अशी मोहीम जणू हाती घेतल्याचे चित्र सध्या सोशल मीडियावर सुरु झाले आहे.
मुळात सोशल मिडीया म्हटले की, क्षणात जगभरात घडत असलेल्या घटनांचा आढावा देणारं माध्यम. टिव्ही, मोबाईल, मोबाइल सर्वाधिक उपयुक्त फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्साग्राम यासह अनेक प्लॅटफार्मवर सतत नवीन काहीतर घडत असते. या माध्यमांवर या पिढीतील युवक युवती आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखत आपली मते ठामपणे मांडत असतात. त्यामुळेच इंटरनेट किंवा सोशल मिडीयाचा जमाना आहे, असे म्हटले जाते. सोशल मिडीया क्षणभरात कोणाला कुठे नेईल याचा अंदाज बांधणे तसा कठीणच आहे. याचा अनुभव विशेष करुन राजकीय क्षेत्रातली लोकांना तर येतोच.
सोशल मिडीयावर नेहमीच सातत्याने बदल होत असतात. विशेष करुन राजकीय घडामोडी घडल्यानंतर एखाद्या राजकीय व्यक्तीवर प्रचंड टीका केली जाते. किंवा त्याच बरोबरीला सिम्पथी देखील मिळते. आज आपण असाच सोशल मिडीयावर होणाऱ्या बदलातील नवीन ट्रेंड बद्दल चर्चा करणार आहोत.
नुकताच फेसबुकवर 'कपल चॅलेंज' असा ट्रेंड सुरु झाला आहे. यात प्रत्येक जण आपल्या फेसबुक पेजवरुन जोडीदाराचे (पती-पत्नी) फोटो शेअर करताना दिसू लागले आहे. मागील चोवीस तासात या नवीन ट्रेंडने सर्वांच्या मनावर भुरळ घातली असून सगळीकडे (हॅशटॅग कपल चॅलेंज) दिसत आहे.
या ट्रेंडमध्ये फेसबुक अकाऊंटवरुन 'हॅशटॅग कपल चॅलेंज' असे लिहून जोडीदारासमवेत फोटो शेअर केला जात आहे. कोणी लग्नातले फोटो शेअर करीत आहेत, काही जण पर्यटनाला गेल्यानंतर त्यावेळच्या आठवणींना उजाळा देणारा जोडीतील फोटो शेअर करीत आहेत. तर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या फेसबुक अकाऊंटरुन देखील या ट्रेंडचे अनुकरण केले जात आहे.
'कपल चॅलेंज' विरोधात 'सिंगल चलेंज'
मागील काही तासांमध्ये या ट्रेंडने भुरळ घातली. मात्र, कपल चॅंलेजविरोधात आता लग्नाच्या बंधनात जे नाहीत. त्या गटातील युवक युवतीने देखील सिंगल चॅलेंज ट्रेंड सुरु केला आहे. त्यामुळे कपल चॅलेंज ट्रेंड विरोधात सिंगल चॅलेंज असे सोशल मिडीयावर युद्ध सुरु झाले आहे.
सोशल मिडीयाबाबत बदलत्या ट्रेंडबाबत अभ्यासकांनी अनुभव शेअर करताना सांगीतले की, सोशल मिडीयावर विशेष करुन राजकीय घडामोडीवर सर्वाधिक ट्रोल केले जाते. त्यापाठोपाठ सिनेसृष्टीतल्या घडामोडीं वाचकांना आवडतात. तर प्रत्येक आठवड्यात एव्हाना काही तासांमध्ये नवीन ट्रेंड समोर येत असतात. आणि टेक्नीस्नेही असलेल्या या पिढीत तो बदल क्षणात स्विकारला जातो. तसाच हा कपल चॅलेंज नव्या ट्रेंडने सर्वांना भुरळ घातली आहे.
कोरोनानंतर असा होत गेला ट्रेंड मध्ये बदल...!
कोरोनाचे सावट जसे आपल्याकडे आले. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाले. जवळपास चार ते पाच महिने सर्व बंद होते. अशा परिस्थितीत सोशल मिडीयावर जुन्या आठवणींना उजाळा देणारे फोटो शेअर होऊ लागले. त्याचबरोबरीला फेसबुक लाईव्ह करणे हा सर्वात आवडीचा विषय बनला होता. ऑनलाईन मुलाखती, ऑनलाईनद्वारे वर्क फ्रॉर्म होम ही संकल्पना समोर आली. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण घेतले जात आहे. फोटो एडीट ट्रेंड देखील बराच काळ सर्वांच्या मनावर भुरळ घालणारा ठरला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.