छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आपल्या आंदोलनामुळे प्रसिद्ध आहे. या पक्षाचे आपले मतदारही आहेत. पण, राज्यात हळूहळू लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदार संघामध्ये मात्र मागील काही महिन्यांपासून मनसे थंड पडल्याचे चित्र आहे. परिणामी, मनसैनिकांच्या मनात चाललेय काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी असते. वर्तमान परिस्थितीचे ते ‘टोमणेभरीत’ वर्णन करतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी अनेक फॉलोअर्स आहेत. मात्र, सध्या त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या पक्षाचा अजेंडा, विचार नागरिकांपर्यंत पोचविण्यास कमी पडत आहेत. त्यामुळे पक्ष संघटनही वाढत नाही. हे चित्र ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वीचे आहे. त्यामुळे पक्षाने होणारी निवडणूक सोडून दिली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाही म्हणायला पक्षाचे अनुभवी नेते बाळा नांदगावकर यांनी शहरात येऊन आढावा घेतला होता. पण, ते मुंबईला जाताच पक्ष कार्यकर्ते पुन्हा थंड पडले.
आक्रमक असलेला हा पक्ष शहरात गेल्या काही काळात बॅकफूट वर गेल्याचे दिसत आहे. जिल्हा कार्यकारिणीकडून पूर्वी जनतेच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत होती. आता ती होताना दिसत नाहीत.
आक्रमक असलेला हा पक्ष शहरात गेल्या काही काळात बॅकफूट वर गेल्याचे दिसत आहे. जिल्हा कार्यकारिणीकडून पूर्वी जनतेच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत होती. आता ती होताना दिसत नाहीत.
मोजकेच गट कार्यरत
शहरात आणि जिल्ह्यात मनसेची फादर बॉडी सायलेंट मोडवर आहे. दुसरीकडे पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मनविसे आणि अन्य एक गट मात्र सातत्याने वेगवेगळ्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरत आहे. मात्र, त्यांना पक्षाच्या वरिष्ठाकडून बळ मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस राजीव जवळीकर, जिल्हाध्यक्ष मंगेश साळवे, गजानन गोमटे ही तरुण फळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत आहे. एका इंग्रजी स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या विषबाधा प्रकरणात जवळीकर, साळवे यांनी पाठपुरावा केला. पण, त्यांना मर्यादा आहेत.
मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुरडकर, गजन गौडा यांनीदेखील मराठवाडा अमृत महोत्सवात शासनाकडून आलेल्या कोट्यवधींच्या निधीचा गैरव्यवहारावर चर्चा घडवून आणली. पण, या पलीकडे पक्षाकडून ठोस आंदोलने झाली नाहीत.
आश्वासक चेहऱ्याची गरज
मनसेतील गटबाजी सर्वश्रुत आहे. मनसे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शहर आणि ग्रामीणमध्ये ओळख असलेल्या वजनदार चेहऱ्याची पक्षाला गरज आहे. निवडणूक लढवण्याचे जर निश्चित झाले तर विद्यमान पदाधिकारी वगळता नवीन चेहऱ्यालाही संधी मिळू शकते, अशी शक्यता मुंबईच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.