world meteorological day. 
छत्रपती संभाजीनगर

World Meteorological Day 2021: ग्रीन वॉटरवरील पीक पद्धतीची बदलत्या वातावरणात गरज 

मधुकर कांबळे

औरंगाबाद: बदलत्या वातावरणात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व शेतीला फायद्यात आणण्यासाठी ग्रीन वॉटरवर म्हणजे पावसाच्या पाण्यावर येणारी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे गट करून गावातच शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागणार आहे, असे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जगभर २३ मार्च दरवर्षी जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. बदलत्या हवामानात शेतीपुढे मोठी आव्हाने आहेत. या अनुषंगाने कृषी हवामानाचे अभ्यासक व निवृत्त कृषी अधिकारी उदय देवळाणकर म्हणाले, की पूर्वी गावातील बारा बलुतेदारांना गावातच काम देणारी शेती केली जात होती. ४००-५०० मिलिमीटर पडणाऱ्या पावसाला साजेशी स्थिर शेती आपल्या इथे व्हायची. मात्र नंतर स्वीकारलेल्या पीकपद्धतीमुळे भूजल संपायला लागले आहे. पूर्वी २४ पैकी ९-१० ऋतू शेतकरी पावसाचे समजत होते मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळ केवळ ढगफुटी आणि दुष्काळ अशीच स्थिती झाली आहे.

येणाऱ्या काळात बाष्पीभवनाचे फार मोठे आव्हान राहणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील व सांडपाणी ग्रे वॉटर, भूजल व धरणातील ब्ल्यू वॉटर तर पावसाचे पाणी ग्रीन वॉटर अशा तीन प्रकारात पाण्याचे वर्गीकरण केले जाते. भारतीय शेती ही ग्रीन वॉटरवर येणारी आहे. या पावसाच्या पाण्यावर आधारीत पिके घेऊन अशी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे गट तयार करावेत. गावातच शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारून गावातील युवकांमध्ये उद्योजकता वाढवली पाहिजे व पावसाच्या पाण्यावर आधारीत पिकांची प्रॉफिटीबिलीटी वाढवावी लागेल अशी धोरणे आखली पाहिजे असे मत श्री. देवळाणकर यांनी व्यक्त केले. 

शेतीपूरक व्यवसायावर लक्ष केंद्रित करा -
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाचे डॉ. कैलास डाखोरे म्हणाले, की वैज्ञानिक अभ्यासानुसार, उष्णतेच्या लाटा आणि मोठी वादळे यासारख्या घटना मानवी-हवामानातील बदलामुळे वारंवार किंवा अधिक तीव्र होण्याची शक्यता असते. उष्णतेचे सरासरी तापमान वातानुकूलन खर्च वाढवू शकते आणि काही पिकांच्या वाढीसाठी देखील परिणाम करू शकतो. हवामानातील अधिक तीव्र बदल देखील समाजासाठी धोकादायक आहेत.

वारंवार आणि तीव्र उष्णतेच्या घटनांमुळे आजार आणि मृत्यू वाढू शकतात, विशेषत: असुरक्षित लोकांमध्ये आणि काही पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी बदलत्या हवामानाचा पूर्व अनुमान काढून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. सातत्याने अनियमित हवामानामध्ये पीक पद्धती निश्चित करणे, शेतीतील कामाचे नियोजन करणे यासाठी सध्या हवामानाचा अंदाज शेतकऱ्यापर्यंत पोचवला जात आहे. त्या अनुषंगाने यांचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना शेतीचे योग्य नियोजन करणे शक्य होईल. 

(edited by- pramod sarawale)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT