Youth Drowned In Aurangabad  esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad|आईचा आधार हिरावला, पाण्यात बुडून एकुलत्या एक मुलाचा अवेळी मृत्यू

अमोल लहान असतानाच वडिलांचे निधन झाले होते.

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद ) : लोहगाव (ता.पैठण) येथील एका तरुणाचा लामगव्हाण परिसरातील जायकवाडी जलफुगववटा क्षेत्राच्या पाण्यात बडुन मरण पावल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार (ता.२५) दुपारी घडली. अमोल सुनील इथापे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) लोहगावातील तीन तरुण मित्र अमोल इथापे, शुभम इथापे व दत्ता बोरूडे हे सकाळी दहावाजेनंतर दुचाकीने लामगव्हाण परिसरातील जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) जलफुगववटा क्षेत्रातील पाण्यात उतरले असता एका ठिकाणी अमोल हा खोल पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न इतर सोबतींनी केला. परंतु त्यांना यश आले नाही. (Youth Drowned In Jayakwadi Back Water In Paithan Taluka Of Aurangabad)

या घटनेची एका मित्राने जवळील शेतकऱ्यांना कळवली असता तात्काळ लामगव्हाण येथील तरूणांनी पाण्यात बेपत्ता तरूणाचा शोध घेऊन डिग्गीद्वारे पाण्याबाहेर काढत तात्काळ बिडकीन ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. लोहगाव बीट जमादार सोमनाथ तांगडे यांनी रूग्णालयात पंचनामा करून आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला. या घटनेची लोहगावतील सर्व थरातील लोकांनी शोक व्यक्त केली. सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आई व आजी-आजोबांचा आधार गेला

मृत तरुण एकूलता एक होता. त्याचे वडील लहानपणीच वारले होते.आई, बहीण,आजोबा, आजीचा आधार गेल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT